• Mon. Sep 14th, 2026

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना जयंतीनिमित्त मंत्रालयात अभिवादन; मान्यवरांकडून आदरांजली – महासंवाद

ByMH LIVE NEWS

Jul 22, 2026
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना जयंतीनिमित्त मंत्रालयात अभिवादन; मान्यवरांकडून आदरांजली – महासंवाद

मुंबई, दि. २२: दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त आज मंत्रालयात महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

माजी मंत्री आमदार धनंजय मुंडे, आमदार जयंत आसगावकर, आमदार शिवाजीराव गर्जे, सहकार विभागाचे प्रधान सचिव प्रवीण दराडे, सामान्य प्रशासन विभागाचे प्रधान सचिव डॉ. अतुल पाटणे, उपमुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ.राजेश देशमुख आदींसह उपमुख्यमंत्री कार्यालयातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी दिवंगत पवार यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले. सामान्य प्रशासन विभागाचे अवर सचिव रामदास कोळेकर, कक्ष अधिकारी निलेश हरड, यांच्यासह मंत्रालयातील अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

००००

प्रविण भुरके/स.सं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed