• Wed. Jul 22nd, 2026

    दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना विधानभवनात अभिवादन – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Jul 22, 2026
    दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना विधानभवनात अभिवादन – महासंवाद

    मुंबई, दि. २२: दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त आज विधानभवन येथे त्यांच्या प्रतिमेस विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, विधानपरिषदेचे उपसभापती सचिन अहिर, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

    आमदार शिवाजीराव गर्जे, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे सचिव-1 जितेंद्र भोळे, सचिव-4 शिवदर्शन साठ्ये, सहसचिव राजेश तारवी, उपसचिव विजय कोमटवार, (संचालक, वि.स.पागे), संसदीय प्रशिक्षण केंद्र आणि जनसंपर्क अधिकारी निलेश मदाने यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनी देखील स्व. अजितदादा पवार यांच्या प्रतिमेस गुलाबपुष्प अर्पण करुन अभिवादन केले.

    ००००

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed