• Sun. Jul 19th, 2026

    Dharavi Redevelopment: मुलुंड डम्पिंगची जागा अदानी समूहाला; धारावी प्रकल्पाच्या कामांसाठी भाडेपट्टा 98 कोटी रुपयांवर

    Dharavi Redevelopment: मुलुंड डम्पिंगची जागा अदानी समूहाला; धारावी प्रकल्पाच्या कामांसाठी भाडेपट्टा 98 कोटी रुपयांवर

    मुंबई : धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या कास्टिंग यार्ड, रेडिमिक्स काँक्रीट प्रकल्पासाठी मुलुंड डम्पिंग ग्राउंडमधील १५ एकर जागा मुंबई महापालिका विशेष हेतू कंपनी असलेल्या नवभारत मेगा डेव्हलपर्स प्रा. लिमिटेडला (अदानी कंपनीची उपकंपनी) देणार आहे.

    यासंदर्भातील सुधारित प्रस्ताव घनकचरा व्यवस्थापन विभागाने तयार केला असून त्याला मंजुरी मिळावी, यासाठी जुलैच्या पहिल्या आठवड्यात आयुक्त अश्विनी भिडे आणि सुधार समितीकडे प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. सुधार समितीत हा प्रस्ताव लवकरच मंजुरीसाठी येणार आहे. या आधी पाच वर्षांसाठी १८१ कोटी ३५ लाख रुपये भाडेपट्टा ठरला असतानाच तो कमी करून ९८ कोटी ४६ लाख रुपयांना देण्यात येणार आहे.

    Maharashtra Politics : महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी, ठाकरेंच्या 6 बंडखोर खासदारांच्या गटाला विलीनीकरणाला मंजुरी
    धारावी पुनर्विकास प्रकल्पांतर्गत विशेष हेतू कंपनी (नवभारत मेगा डेव्हलपर्स प्रा. लिमिटेड) पात्र रहिवाशांसाठी मोफत घरे , तसेच सुमारे साडेतीन ते चार लाख अपात्र रहिवाशांसाठी परवडणारी भाडेतत्त्वावरील घरे बांधणार आहेत. अपात्र झोपडीधारकांचे पुनर्वसन मुलुंडमधील मिठागर येथे करण्यात येणार आहे. यामुळे मुलुंडच्या पायाभूत सुविधांवरील ताण अधिक वाढेल, असा अंदाज व्यक्त करून स्थानिकांसह लोकप्रतिनिधींनी या पुनर्वसनाला तीव्र विरोध केला आहे. मात्र हा विरोध न जुमानता या प्रक्रियेला गती देण्यात आली आहे. धारावी पुनर्वसन प्रकल्पाचे कास्टिंग यार्ड, रेडीमिक्स काँक्रीट प्लाण्टसह अन्य कामांसाठी मुलुंड डम्पिंग ग्राऊंडमधील १५ एकर जागा भाडेतत्त्वावर देण्याचे नियोजन मुंबई महापालिकेने यापूर्वी केले होते. घनकचरा व्यवस्थापन विभागाने याबाबत प्रस्तावात सुधारणा करून तो मुंबई महापालिका आयुक्त आणि सुधार समितीकडे पाठवला आहे. त्यामुळे या निर्णयावर शिक्कामोर्तब होणार आहे.

    या आधी पाच वर्षांसाठी १५ एकर जागा रेडीरेकनर दराने प्रतिचौरस मीटर ४७ हजार ८०० रुपये याप्रमाणे १८१ कोटी ३५ लाख २ हजार १२५ रुपयांना दिली जाणार होती. मात्र महापालिकेने यामध्ये भाडे दरनिश्चिती आणि पर्यायांचा आढावा घेतला. यामध्ये मुंबई महापालिका प्रमुख अभियंता (पूल) विभागामार्फत विविध प्रकल्पांच्या कास्टिंग यार्डसाठी २५२ रुपये प्रतिचौरस मीटर प्रति महिनादर लागू आहे. त्याप्रमाणे दर आकारणीस प्रशासकीय मंजुरी प्राप्त झाली आहे. त्यामुळे हे दर वाजवी असल्याचे घनकचरा व्यवस्थापन विभागाने पाठवलेल्या प्रस्तावात नमूद केले आहे. मुलुंड डम्पिंग ग्राउंडचा भूभाग वापरण्यायोग्य करण्यासाठी नवभारत मेगा डेव्हलपर्सला सुमारे २० कोटी रुपये अतिरिक्त खर्च येणार असून हा खर्च वाजवी असल्याचे नवभारत मेगा डेव्हलपर्सकडून नियुक्त सल्लागार कंपनीने महापालिकेला सांगितले आहे.

    Maharashtra TimesCoastal Road Fire : हॉर्न वाजवून लक्ष वेधलं, दोन कार चालकांची समयसूचकता, कोस्टल रोड बोगद्यात गाडी पेटण्यापूर्वी कुटुंबाची थरारक सुटका
    प्रस्तावांचे कागदी घोडे
    मुलुंड डम्पिंग ग्राउंड एकूण ४६ एकर जागेवर आहे. सन २०१८मध्ये हे डम्पिंग बंद करण्यात आले. ६४ एकर जमिनीवर महापालिकेने गोल्फ कोर्स विकसित करावे, अशी मागणी भाजप आमदार मिहीर कोटेचा यांनी मुंबई महापालिकेकडे केली होती. तर खासदार संजय दिना पाटील यांनी रुग्णालय उभारणीची मागणी केली होती.

    या निर्णयाविरोधात मुलुंडकर आता रस्त्यावर उतरून आंदोलन करतील. या डम्पिंग ग्राउंडची उर्वरित जागाही एका नामांकित विकासकाच्या घशात घातली जाणार. त्या ठिकाणीही प्रकल्पबाधितांसाठी घरे उभारण्याचे नियोजन आहे. कुठे गेला गोल्फ कोर्स ? मुलुंडचे नामांतर आता विस्थापितांची कॉलनी करून टाका. -अॅड. सागर देवरे, शिवसेना उबाठा पक्षाचे विधानसभा संघटक (मुलुंड विधानसभा)

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

    किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

    पत्रकारितेतील अनुभव
    किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

    शैक्षणिक पात्रता
    किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed