• Thu. Sep 3rd, 2026

Chandrapur News: गरम डाळ-भाजीत पडली जिवंत पाल, चंद्रपूरच्या आश्रमशाळेतील 31 विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा, घटनेनं खळबळ

म. टा. वृत्तसेवा, चंद्रपूर: जिवती तालुक्यातील नगराळा येथील अंब्रू नाईक माध्यमिक आश्रमशाळेतील ३१ विद्यार्थ्यांना जेवणातून विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे पालक आणि स्थानिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.

जिवती तालुक्यातील अंब्रू नायक माध्यमिक आश्रमशाळेत इयत्ता पहिली ते दहावीपर्यंतचे विद्यार्थी शिक्षण घेतात. सुमारे ५० विद्यार्थी वसतिगृहात राहून शिक्षण घेत असल्याचे सांगण्यात येते. सदर आश्रमशाळा ही इतर मागास बहुजन कल्याण विभागाची आहे. मंगळवारी सकाळी स्वयंपाकघरात डाळभाजी तयार केली जात असताना त्यात जिवंत पाल पडली.

Manoj Jarange Patil : जरांगे पाटलांच्या मागण्यांवर सरकारची खलबतं; मंत्री, आमदारांची वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत महत्त्वाची बैठकस्वयंपाक करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे ही बाब लक्षात आली नाही. यानंतर ३० विद्यार्थी जेवणासाठी बसले आणि त्यांनी भाजी-पोळी खाल्ली. मात्र, डाळभाजी वाढत असलेल्या काही विद्यार्थिनींना त्यात पालीचे लहान-मोठे तुकडे तरंगताना दिसले. त्यानंतर तातडीने इतर विद्यार्थ्यांना जेवण करण्यापासून रोखण्यात आले. मात्र, तोपर्यंत जे विद्यार्थी जेवण करून झाले होते, त्यांना उलट्या, मळमळ आणि पोटदुखीचा त्रास सुरू झाला.

प्रशासनाकडून तयार अन्नाचे नमुने प्रयोगशाळेतील तपासणीसाठी पाठविण्यात येत आहेत. या घटनेमुळे आश्रमशाळेतील स्वच्छता आणि विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या भोजनाच्या गुणवत्तेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. घटनेनंतर पालकांमध्ये मोठा संताप व्यक्त होत असून, दोषी कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

Maharashtra TimesNutritious Meal: सरकारी बैठकांतून बटाटेवडे, चहा हद्दपार; आरोग्यदायी पदार्थांचा समावेश करण्याचा मंत्रिमंडळाचा निर्णयपालक-विद्यार्थ्यांचाआंदोलनाचा इशारा

मुंबई : राज्यातील शाळा-महाविद्यालये बंद करण्याच्या निर्णयांना विरोध करण्यासह शिक्षणातील विविध प्रश्नांवर पालक, विद्यार्थी, शिक्षक आणि सामाजिक संघटनांनी आता आंदोलनाचा इशारा दिला आहे. पाच ऑक्टोबरपासून राज्यव्यापी बेमुदत आंदोलन करण्यात येणार असून, सरकारने मागण्यांवर तातडीने निर्णय न घेतल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्धार ‘शाळा वाचवा, शिक्षण वाचवा मंच, महाराष्ट्र’ने केला आहे. राज्यातील एकही प्राथमिक किंवा माध्यमिक शाळा, महाविद्यालय बंद होऊ नये, प्रत्येक वर्गाला स्वतंत्र शिक्षक मिळावा, अशी मागणी मंचाने केली आहे. या आंदोलनात राज्यातील ३० जिल्ह्यांमधील पालक, विद्यार्थी, शिक्षक, शिक्षणप्रेमी नागरिक आणि विविध सामाजिक संघटना सहभागी होतील. आंदोलनाच्या तयारीसाठी जिल्हा, विभाग आणि तालुकास्तरावर प्रबोधन बैठका घेतल्या जाणार आहेत.

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

शैक्षणिक पात्रता
किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.… आणखी वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed