• Thu. Sep 3rd, 2026

Tribal community’s:आश्रमशाळांमधील ५८४ आदिवासी विद्यार्थ्यांच्या मृत्यूप्रकरणी मंत्री ,अधिकाऱ्यांचा राजीनामा द्या, आश्रमशाळा वसतिगृहांमध्ये सुधारणा करा आदिवासींवरील अत्याचार थांबवा अशा मागण्यांसह हजारो आदिवासी विद्यार्थी आणि पालकांनी उलगुलान मोर्चा काढला.

(फोटोमहाराष्ट्र टाइम्स)
म.टा.विशेष प्रतिनिधी,नाशिक:‘बिरसा मुंडांचा एकच उलगुलान, उलगुलान’, ‘लडेंगे.. जितेंगे’, ‘एक तीर, एक कमान.. सारे आदिवासी एक समान’ अशा घोषणांनी जिल्हाधिकारी कार्यालय आणि आदिवासी आयुक्तालयाचा संपूर्ण परिसर दणाणून गेला.

विकासमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी

जोपर्यंत आदिवासी विकासमंत्र्यांचा राजीनामा होत नाही, तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, असा आक्रमक निर्धार करून दहा हजारांवर आंदोलकांनी आयुक्तालयासमोर ठिय्या मांडला. मागण्या मान्य न झाल्यास प्रसंगी ‘नाशिकचा जनसागर मुंबईकडे वळवू,’ असा इशाराही त्यांनी दिला.

ईदगाह मैदानावर विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू

राज्यातील आदिवासींच्या प्रश्नांसह आश्रमशाळांमधील विद्यार्थी मृत्यू, वसतिगृहांतील प्रश्नांसंदर्भात गेल्या पंधरा दिवसांपासून ईदगाह मैदानावर विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे. आदिवासींच्या प्रश्नांसाठी मंगळवारी राज्यव्यापी मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.

आक्रमक घोषणांचा गजर

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, आमदार विजय वडेट्टीवार, माजी मंत्री वसंत पुरके यांनी आंदोलनस्थळी भेट देत आंदोलनाला पाठिंबा दिला. त्यानंतर त्र्यंबक रोडवरील ईदगाह मैदानापासून सुरू झालेला हा महामोर्चा जिल्हा परिषद, शालिमार, महात्मा गांधीरोड, जिल्हाधिकारी कार्यालय, जुने सीबीएसमार्गे आदिवासी विकास भवनवर पोहोचला. हातात मागण्यांचे फलक, आक्रमक घोषणांचा गजर असलेला हा जनसागर पुढे सरकत असताना शहरातील वातावरण तापत गेले.

Maharashtra TimesThane News : कळवा रुग्णालयात जेवणात सापडले झुरळ;अन्नाचे नमुने FDA कडे रवाना ,डोळ्यांच्या शस्त्रक्रियेसाठी दाखल असलेल्या रुग्णाच्या जेवणात आढळला हा प्रकार

राज्यभरातील आदिवासी विद्यार्थ्यांचा सहभाग

आश्रमशाळांमधील गैरव्यवस्था, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न आणि आदिवासी विकास विभागाच्या कारभाराविरोधात हजारो आदिवासी विद्यार्थी, पालक आणि समाजबांधव रस्त्यावर उतरले होते. त्यात माजी मंत्री वसंत पुरके, सुधाकर राऊत, प्रशांत गावंडे, ललित चौधरी, तुळशीराम खोटरे, लक्ष्मी जाधव यांच्यासह राज्यभरातील आदिवासी विद्यार्थी सहभागी झाले होते.

Maharashtra TimesPune Metro: अखेर मेट्रो पुणेकरांच्या पसंतीस उतरली;आजवरच्या उच्चांकी मासिक प्रवासी संख्येची नोंद,उत्पन्नातही भरघोस वाढ

लीना बनसोड यांनी आंदोलनस्थळी येत आंदोलकांची भेट घेतली

दरम्यान, आदिवासी विकास विभागाच्या आयुक्त लीना बनसोड यांनी आंदोलनस्थळी येत आंदोलकांची भेट घेऊन निवेदन स्वीकारले. शासनाकडे मागण्या मांडण्याचे आश्वासन त्यांनी दिले. त्यानंतर आयुक्तालयासमोरील ठिय्या मागे घेण्यात आला. मात्र, ईदगाह मैदानावरील आंदोलन सुरूच होते.

कांचन परुळेकर

लेखकाबद्दलकांचन परुळेकरकांचन परुळेकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कन्सलटंट पदावर कार्यरत आहेत. कांचन स्थानिक बातम्या, पायाभूत सुविधा, बांधकाम आणि विकास प्रकल्प यासाठी लिखाण करतात. त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाला सुरुवात ही महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमधून झाली. मार्च २०२६ मध्ये महाराष्ट्र टाइम्सच्या व्हिडिओ विभागात त्यांनी इंटर्न म्हणून काम केले. सुरुवातीला त्यांनी युट्यूब, फेसबुक आणि इन्स्टाग्रामसाठी कन्टेंट तयार करताना व्हिडिओ आणि लेख लिहिले आहेत. महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी, स्थानिक बातम्या आणि क्राइमसह स्पोर्ट्सवर इत्यादी विषयांचे वाचन आणि लेखन करण्याची त्यांना विशेष आवड आहे.

कांचन यांचे संपूर्ण शिक्षण मराठी माध्यमातून झाले असून पत्रकारितेची आवड असल्याने त्यांनी कोकण ते मुंबई असा शैक्षणिक प्रवास केला. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण गावी पूर्ण केले. इकोनॉमिक्स या विषयातून पद्वी घेतली. लिखाणाची आवड, संवाद साधण्याचे कौशल्य आणि पत्रकारितेची आवड समजून घेऊन साठ्ये कॉलेज विलेपार्ले येथे वृत्तपत्रविद्या आणि संवाद या विषयात त्यांनी पद्व्युत्तर शिक्षणासाठी प्रवेश घेतला.

महाविद्यालयीन काळात कला आणि नाटक विषयात विशेष आवड असल्याने त्यांनी अभिनयदेखील केले आहे. काही नाटक त्यांनी लिहिले आहेत. मुंबई विद्यापीठाच्या युथ फेस्टिवलमध्ये त्यांना अभिनयासाठी ब्रॉन्झ आणि सिल्व्हर मेडल देण्यात आले आहेत. कविता आणि लेख लिहिण्याची आवड असल्याने शाळा ,कॉलेज मासिक अंकात त्यांचे लेख देखील प्रसिध्द झाले आहेत.

२०२६ मध्ये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन सोबत जोडल्या गेल्यानंतर त्यांची पत्रकारितेची आवड अगदी स्पष्ट झाली. बोलण्यातला स्पष्टपणा लिखाणातली पारदर्शकता अधिक नव्याने समजत गेली. तीन महिन्यांच्या इंटर्नशिप नंतर त्या आता कन्सलटंट पदावर म.टा. समुहात सहभागी झाल्या आहेत. पारदर्शकता आणि विश्वासार्ह माहिती वाचकांपर्यंत पोहचवण्याचं काम त्या करत आहेत.… आणखी वाचा