• Thu. Sep 3rd, 2026

म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर/जालना: मराठा आरक्षण व अन्य मागण्यांबाबत कार्यवाहीबाबतचा एक मसुदा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना मंगळवारी देण्यात आला. या प्रश्नावर सरकार सकारात्मक असून, जरांगे यांच्या प्रतिसादाची प्रतीक्षा आहे. त्यांनी उपोषण सोडावे, अशी भूमिका मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष तथा जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी बुधवारी छत्रपती संभाजीनगरमध्ये मांडली.

दरम्यान, ‘सरकारचा वेगळाच डाव आहे. मुंबईहून येता आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये बसून चर्चा होत आहे. मसुदा नव्हे; ‘जीआर’ काढा नाही तर आम्ही मुंबईत यायला सज्ज आहोत,’ असा इशारा जरांगे यांनी बुधवारी अंतरवाली सराटीत पत्रकार परिषदेत दिला. गेल्या तीन वर्षांत कधीही जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षक वाटाघाटीसाठी आले नाहीत. राज्य सरकारने मंगळवारी त्यांना पाठविले.

Manoj Jarange : मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला मोठं यश, राज्य सरकारकडून महत्त्वाच्या मागण्या मान्य, पण अंतरवलीतील उपोषणाला ब्रेक नाहीचपहिल्यांदा रद्द केलेले प्रमाणपत्र वैध करून द्या, ६८ लाख कुणबी प्रमाणपत्रे वाटप सुरू करा, सातारा-कोल्हापूर संस्थानबाबतचे ‘जीआर’ काढा, हैदराबाद गॅझेट नुसार प्रमाणपत्र वाटप सुरू करा, अशी मागणी जरांगे यांनी केली.

सलाइन लावून घेण्याची तयारी

जालना : आमदार प्रसाद लाड यांनी बुधवारी रात्री साडेआठलाा अंतरवाली सराटीत मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. पंधरा मागण्यांवर सरकारच्या वतीने देण्यात आलेल्या मसुद्याचे त्यांनी विवेचन केले. आमदार लाड यांच्या आग्रहाखातर जरांगे यांनी पाणी घेतले आणि सलाइन लावून घेण्याची तयारी दर्शवली.

Maharashtra TimesEknath Shinde : आम्हीच खरी शिवसेना आहोत, सुनावणीनंतर एकनाथ शिंदे यांचं वक्तव्यमंडल आयोगाची आठवण

सन १९९४ मध्ये मंडल आयोगाच्या शिफारशी लागू झाल्यानंतर मराठा समाजाचा आरक्षण दिले असते, तर पुढील इतिहास घडला नसता. या पापाचे वाटेकरी कोण, तत्कालीन मुख्यमंत्री कोण होते, अशी विचारणा करीत मंत्री विखे पाटील यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे नाव न घेता टोला मारला.

मसुदा आपण वाचलेला नाही. तब्येत खराब झाल्यावर, माणसे बेशुद्ध पडल्यानंतर तुम्ही येणार आणि वाचला का विचारणार. सरकार मराठा समाजाला फसवत आहे.-मनोज जरांगे पाटील

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

शैक्षणिक पात्रता
किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.… आणखी वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed