Nashik Crime News : नाशिकमध्ये तरुणीची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली. या घटनेनंतर काही तासांतच संशयित आरोपी तरुणानेही आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
नाशिक तरुणीची हत्या तरुणाची आत्महत्या(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
नाशिक : नाशिकमधील इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. काल शुक्रवारी रात्री एका तरुणीची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आल्यानंतर, आज शनिवारी पहाटेच्या सुमारास संशयित आरोपी तरुणाचाही मृतदेह पोलिसांना आढळून आला आहे. तरुणीची हत्या केल्यानंतर आरोपीने स्वतः आत्महत्या केल्याचा प्राथमिक संशय व्यक्त केला जात आहे. एकतर्फी प्रेमातून प्रेयसीची हत्या केल्यानंतर प्रियकरानेही इंदिरानगर जॉगिंग ट्रॅकमध्ये एका झाडावर गळफास घेत आत्महत्या करून जीवन संपविण्याची घटना घडली आहे.
सोसायटीच्या गार्डनमध्ये झाली हत्या
मिळालेल्या माहितीनुसार, नाशिकच्या इंदिरानगर भागातील वनसंपदा सोसायटीत ही घटना घडली. मृत तरुणीचे नाव वैष्णवी अनिल आवारे असे असून ती या परिसरात एका पीजी (Paying Guest) मध्ये राहत होती. शुक्रवारी रात्री 10.30 वाजेच्या सुमारास वनसंपदा सोसायटीच्या गार्डनमध्ये वैष्णवीची हत्या करण्यात आली. या घटनेची माहिती मिळताच इंदिरानगर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि तपास सुरू केला. Nashik Crime : रात्रीच्यावेळी रुमवर जाताना अचानक हल्ला, नाशकात तरुणाने PG मध्ये राहणाऱ्या तरुणीला संपवलं; घटनेला प्रेमप्रकरणाची किनार
नेमकी घटना काय?
या घटनेबाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, नाशिकच्या इंदिरानगर येथील वनसंपदा सोसायटीतील गार्डनजवळ काल शुक्रवारी रात्री 10:30 वाजेच्या सुमारास ही घटना घडली. वैष्णवी अनिल आवारे असं मृत तरुणीचं नाव आहे. वैष्णवी ही मूळची जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यामधील रहिवासी असून ती नाशिकमध्ये वनसंपदा सोसायटीत पेईंग गेस्ट म्हणून राहत होती. Maharashtra Politics : केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारासाठी राष्ट्रवादी प्रचंड आशावादी, पार्थ पवार-प्रफुल पटेल दोघंही मंत्रिपदासाठी उत्सुक असल्याची चर्चा
प्रेमप्रकरणातून हत्या झाल्याचा संशय
रात्रीच्यावेळी वैष्णवी सोसायटीजवळून जात असताना, एका माथेफिरू तरुणाने तिच्यावर अचानक हल्ला केला. त्याने धारदार चाकूने वैष्णवीवर सपासप वार केले. हा हल्ला इतका भीषण होता की, वैष्णवी रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर कोसळली. ती निपचित पडल्यानंतर हल्लेखोर घटनास्थळावरून फरार झाला. वैष्णवी रस्त्याच्या कडेला रक्ताच्या थारोळ्यात पडलेली पाहून स्थानिक नागरिकांनी तातडीने याची माहिती पोलिसांना दिली. माहिती मिळताच इंदिरानगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. लेकीच्या हत्येची बातमी ऐकल्यानंतर आई-वडिलांनी एकच हंबरडा फोडला.
लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.
प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.
‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.… आणखी वाचा