• Sat. Jul 18th, 2026

    दुबईच्या न्यायालयात मुंबईतील बनावट आदेश; वडिलोपार्जित संपत्ती हडपण्यासाठी कृत्य, सहा जणांविरुद्ध गुन्हा

    दुबईच्या न्यायालयात मुंबईतील बनावट आदेश; वडिलोपार्जित संपत्ती हडपण्यासाठी कृत्य, सहा जणांविरुद्ध गुन्हा

    Mumbai News: न्यायालयात सुरू असलेल्या वारसा हक्काच्या वादावर प्रभाव टाकण्यासाठी हा बनावट दस्तावेज तयार करण्यात आल्याचा आरोप आहे.

    मुंबई क्राईम(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    मुंबई : एका भारतीय व्यावसायिकाला गुन्हेगार ठरवण्याबरोबरच त्यांची कोट्यवधी रुपयांची मालमत्ता हडप करण्यासाठी दुबईच्या न्यायालयात मुंबईतील एका न्यायालयाचा बनावट आदेश सादर करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

    मुंबई उच्च न्यायालयाच्या चौकशीच्या आदेशानंतर, कुर्ला पोलिसांनी या याप्रकरणी संयुक्त अरब अमिरातीच्या दोन नागरिकांसह सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

    Maharashtra TimesSanjay Ghadi : दहिसरहून येताना ट्राफिक जॅम, मुंबईत बंगला द्या; उपमहापौरांच्या मागणीवर रितू तावडेंची पहिली प्रतिक्रिया
    खंडाळा येथील रहिवासी वाहिदा हुसेन शत्ताफ यांनी दिलेल्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानुसार, त्यांचे पती हुसेन मोहम्मद शत्ताफ आणि त्यांची ७८ वर्षीय आई फरिदा यांच्यात वडिलोपार्जित मालमत्तेवरून वारसा हक्काचा वाद सध्या दुबईतील न्यायालयात सुरू आहे. या खटल्याच्या सुनावणीत हुसेन शत्ताफ यांची विश्वासार्हता कमी करण्याच्या आणि मालमत्तेवरील त्यांचा दावा कमकुवत करण्यासाठी प्रतिपक्षाने मुंबई न्यायालयातील बनावट कागदपत्रे तयार करून ती दुबई न्यायालयात सादर केल्याचा आरोप वाहिदा यांनी केला आहे.

    बनावट कागदपत्रे दुबईच्या न्यायालयात सादर करण्यात आल्याची कुणकुण लागताच शत्ताफ कुटुंबीयांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने नमूद आदेशाच्या सविस्तर पडताळणीचे निर्देश जारी केल्यानंतर याबाबत चौकशी करण्यात आले. चौकशीदरम्यान, मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांनी न्यायालयाच्या नोंदी तपासल्या आणि सुमारे डझनभर साक्षीदारांचे जबाब नोंदवले. बनावट आदेशाद्वारे दर्शवलेली फौजदारी कारवाई कधीच झाली नव्हती. तसेच, बनावट न्यायालयीन आदेश तयार करताना न्यायालयाच्या डिजिटल स्वाक्षरीचा गैरवापरर करण्यात आल्याचेही आढळून आले. हे बनावट न्यायालयीन आदेश खरे वाटावेत, यासाठी त्यांना बनावट नोटरी शिक्के आणि सह्यांचा वापर करून वापर करण्यात आला आहे.

    Maharashtra TimesSupriya Sule : माझ्या भावाची शेवटची इच्छा पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले, सुप्रिया सुळेंचं विलीनीकरणावर भावनिक वक्तव्य
    यांच्यावर गुन्हा दाखल
    हुमैद मोहम्मद शताफ (यूएई), हलिमा सुलतान अल ओवेस (यूएई), मधुकर रविराज विल्सन (पॉवर ऑफ ॲटर्नी धारक), केन रिचर्ड विल्सन, रझी अहमद, शिवाजी एन. धनगे (नोटरी) यांच्या विरोधात फसवणूक, बनावटीकरण तसेच इतर कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    Maharashtra TimesSonam Wangchuk : सुप्रिया सुळे दिल्लीत सोनम वांगचुक यांच्या भेटीला, केंद्र सरकारच्या सर्वपक्षीय बैठकीत मुद्दा मांडणार
    गुन्हेगार असल्याची बतावणी
    एका प्रकरणात हुसेन मोहम्मद शत्ताफ यांची दुचाकी जप्त करण्यात आली होती. ही दुचाकी परत मिळविण्यासाठी त्यांनी कुर्ला न्यायदंडाधिकाऱ्यांकडे अर्ज केला होता. हे प्रकरण जप्त करण्यात आलेल्या दुचाकीपर्यंत मर्यादित असताना न्यायालयाच्या नोंदींमध्ये फेरफार करण्यात आले. बनावट आदेशात शत्ताफ यांना २५ लाख रुपयांची फसवणूक, पासपोर्ट फसवणूक आणि हवाला व्यवहारांशी संबंधित प्रकरणात दोषी ठरवण्यात आले असून, अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आले आहे, असे भासविण्यात आले होते.

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

    किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

    पत्रकारितेतील अनुभव
    किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

    शैक्षणिक पात्रता
    किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.… आणखी वाचा