Maharashtra Politics : राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्या सल्ल्यानुसार पक्षात बदल सुरू झाले असून, निर्णयप्रक्रियेत अंतिम शब्द मात्र पवार कुटुंबीयांचाच राहणार असल्याचे पक्षातील सूत्रांचे म्हणणे आहे.
प्रशांत किशोर सुनेत्रा पवार(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये संघटनात्मक निर्णय आता एकट्या-दुकट्या नेत्यांऐवजी सामूहिक पद्धतीने घेतले जाणार आहेत. पक्षाच्या कोअर कमिटी आणि विस्तारित कोअर कमिटीच्या नियमित बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेण्याचे ठरले आहे. राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्या सल्ल्यानुसार पक्षात हे बदल सुरू झाले असून, निर्णयप्रक्रियेत अंतिम शब्द मात्र पवार कुटुंबीयांचाच राहणार असल्याचे पक्षातील सूत्रांचे म्हणणे आहे.
पवार कुटुंबीय विरुद्ध पटेल-तटकरे संघर्षाची शक्यता
अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर पक्षातील अलीकडील नेतृत्वबदल आणि पक्षांतर्गत रचनेवरून राष्ट्रवादीत काही प्रमाणात नाराजी होती. कार्याध्यक्ष प्रफुल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या भूमिकांबाबतही पक्षात चर्चा सुरू होती. सुनेत्रा पवार यांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीनंतर निवडणूक आयोगाला पाठविण्यात आलेल्या पक्षरचनेत पटेल आणि तटकरे यांच्या पदांचा उल्लेख नसल्याने नव्या वादाला तोंड फुटले. तसेच, पक्षातील काही निर्णयांवर खासदार पार्थ पवार यांचा प्रभाव असल्याचीही चर्चा होती. त्यामुळे पवार कुटुंबीय विरुद्ध पटेल-तटकरे असा अंतर्गत संघर्ष वाढतो की काय, अशी शक्यता व्यक्त केली जात होती.
या पार्श्वभूमीवर प्रशांत किशोर यांनी सुनेत्रा पवार यांची भेट घेऊन पक्षाच्या पुढील वाटचालीवर चर्चा केली. दोन आठवड्यांपूर्वी झालेल्या कोअर कमिटीच्या बैठकीतही त्यांनी उपस्थित राहून पक्षाच्या कामकाजावर नाराजी व्यक्त केल्याचे समजते. पक्ष सुस्तावला असून त्याला पुन्हा सक्रिय करण्यासाठी विविध सेल आणि विभागांच्या नियमित बैठका घेण्याचा सल्ला त्यांनी दिला. महत्त्वाचे म्हणजे, कोणत्याही एका व्यक्तीकडे निर्णय केंद्रीत न ठेवता सामूहिक निर्णयप्रक्रियेला स्थान देण्याची सूचना त्यांनी केली.
राज्यस्तरीय शिबिराची घोषणा
त्याच अनुषंगाने सोमवारी पक्षाच्या विस्तारित कोअर कमिटीची बैठक झाली. या बैठकीत राज्यस्तरीय शिबिराची घोषणा करण्यात आली. आगामी जिल्हा परिषद निवडणुकांसाठी दिलीप वळसे-पाटील, तर ‘एसआयआर’शी संबंधित बाबींसाठी नवाब मलिक यांची समन्वयक म्हणून नियुक्ती करण्यात आली. पुढील आठवड्यात विस्तारित कोअर कमिटीची पुन्हा बैठक होणार असून, त्यात शिबिराचे पुढील नियोजन ठरणार आहे. शिबिरानंतर जिल्हाध्यक्षांसह इतर संघटनात्मक पदांमध्ये फेरबदल होण्याची शक्यता आहे.
Nidhi Patel : शॉर्ट्सची नाडी, चार्जर अन् प्रायव्हेट पार्टवर जखमा; 22 वर्षीय इंजिनिअर तरुणीच्या मृत्यूचं गूढ, राहत्या घराच्या गच्चीत बॉडीपक्षातील एका ज्येष्ठ नेत्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, आता संघटनात्मक निर्णय, नियुक्त्या आणि धोरणात्मक भूमिका कोअर कमिटीच्या बैठकीतच निश्चित केल्या जातील. संवाद वाढवून पक्ष चालविण्याचा प्रयत्न आहे. मात्र, सामूहिक निर्णयप्रक्रिया असली तरी अंतिम निर्णय पवार कुटुंबीयांचाच राहील.
लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.
पत्रकारितेतील अनुभव
अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.
पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.
अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.
शैक्षणिक पात्रता
अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.… आणखी वाचा