सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांमध्ये अडकलेल्या दोन ट्रेकर्सची अखेर सुखरुप सुटका करण्यात आली आहे. त्यांच्या शोधासाठी पोलीस यंत्रणा आणि इतर सामाजिक संघटनांकडून अथक प्रयत्न करण्यात आले. अखेर या थरारक शोध मोहीमेत दोन्ही तरुण सापडले.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
अमुलकुमार जैन, रायगड : मोठमोठ्या डोंगररांगा असलेल्या भागांमध्ये ट्रेकिंगला जावं, अशी अनेक तरुणांची इच्छा असते. अनेक तरुण आपली ही इच्छा पूर्ण देखील करतात. ट्रेकिंगला जाणाऱ्या तरुण-तरुणींचा ग्रुप असतो. ते सर्वजण एकत्र ट्रेकिंगला जातात. त्यांच्यासोबत काही अनुभवी ट्रेकर्स आणि प्रशिक्षकही असतात. कठीण काळात किंवा संकट काळात कसा मार्ग काढायचा याचं ते प्रशिक्षण देतात. तसेच सर्वांना सोयीस्कर आणि सुखरुप ट्रेकिंग कशी केली जाईल, याची ते काळजी घेतात. अनेक तरुण हे सोलो म्हणजे एकटे किंवा एखाद्या मित्रासोबत ट्रेकिंगला जातात. निसर्गाच्या सानिध्यात, भर जंगलात अनेक जण ट्रेकिंगला जातात. पण अशाचप्रकारे ट्रेकिंगला गेलेल्या दोन तरुणांना थरारक अनुभव आला. ते रस्ता चुकले होते.
सह्याद्रीच्या निसर्गरम्य दऱ्याखोऱ्यांमध्ये ट्रेकिंगसाठी गेलेल्या चेंबूरमधील दोन युवकांची वाट चुकल्याने काही काळ चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र खोपोली पोलीस आणि हेल्प फाउंडेशनच्या तत्परतेमुळे या दोन्ही ट्रेकर्सची सुखरूप सुटका करण्यात यश आले. रविवारी घडलेल्या या थरारक बचाव मोहिमेमुळे मोठा अनर्थ टळला. आर्यन जितेश शिवलानी (वय १८) आणि जहान निलेश भाटिया (वय १८) हे १४ जून रोजी खोपोलीजवळील प्रसिद्ध झेनिथ वॉटर फॉल आणि केपी वॉटर फॉल परिसरात ट्रेकिंगसाठी आले होते. दोघेही मुंबईच्या चेंबूर येथील रहिवासी आहेत.
आर्यन आणि जहान निसर्गाचा आनंद घेताना ते दऱ्याखोऱ्यांमध्ये बरेच पुढे गेले. मात्र अवघड भूभाग, तळपते ऊन आणि प्रदीर्घ भटकंतीमुळे त्यांच्याकडील पाणी आणि खाद्यपदार्थ संपले. त्यातच दोघेही वाट चुकल्याने अडचणीत सापडले.
सुरुवातीला साहसी वाटणारी ही भटकंती काही वेळातच भीतीदायक ठरू लागली. अंधार जवळ येत असल्याने दोघांची चिंता वाढली. अखेर त्यांनी आपल्या पालकांशी तसेच पोलीस हेल्पलाईनशी संपर्क साधून मदतीची विनंती केली.
घटनेची माहिती मिळताच खोपोली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन हिरे यांनी तातडीने शोध मोहीम सुरू केली. यासाठी हेल्प फाउंडेशनची मदत घेण्यात आली. हेल्प फाउंडेशनचे गुरुनाथ साठेलकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी युवकांशी संपर्क साधत त्यांचे लोकेशन मिळवले आणि अवघड डोंगरवाटांमधून केपी वॉटर फॉल परिसराकडे धाव घेतली.
काही तासांच्या अथक प्रयत्नांनंतर बचाव पथक युवकांपर्यंत पोहोचले. त्यांना पाणी, एनर्जी ड्रिंक आणि खाद्यपदार्थ देत मानसिक धीर देण्यात आला. त्यानंतर काळजीपूर्वक दोघांनाही सुरक्षितपणे खाली आणण्यात आले. दत्त मंदिर परिसरात आल्यानंतर त्यांना त्यांच्या कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आले.
या यशस्वी बचाव मोहिमेमुळे ट्रेकर्सच्या कुटुंबीयांनी सुटकेचा निःश्वास सोडला. त्यांनी हेल्प फाउंडेशन आणि खोपोली पोलिसांचे आभार मानले आहेत. दरम्यान, पावसाळी आणि डोंगराळ भागात ट्रेकिंग करताना योग्य नियोजन, पुरेसे पाणी, सुरक्षित साधने आणि स्थानिक मार्गदर्शकांची मदत घेणे आवश्यक असल्याचे आवाहन हेल्प फाउंडेशनने केले आहे.
लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.
डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.
चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.
चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.
महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.
चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.… आणखी वाचा