• Thu. Jun 18th, 2026
    Chandrashekhar Bawankule: खासदार फोडाफोडीशी भाजपचा संबंध नाही; बावनकुळेंचा खुलासा, उद्धव ठाकरेंना आत्मचिंतनाचा सल्ला

    Chandrashekhar Bawankule On Operation Tiger: भारतीय जनता पक्षाचा या संपूर्ण घडामोडींशी काहीही संबंध नसून भाजपाच्या नेत्यांवर टीका करणे किंवा पक्षाला या वादात ओढणे योग्य नाही, असेही बावनकुळे यांनी स्पष्ट केले.

    ऑपरेशन टायगर(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    म.टा.प्रतिनिधी, नागपूर: राज्यात पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मोठा राजकीय धक्का बसला आहे. ठाकरे गटाचे सहा खासदार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात जाणार असून, हे भाजपच्या वतीने करण्यात आल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. मात्र, महसूल तथा नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजपचा याच्याशी काहीही संबंध नसल्याचे स्पष्ट करताना उद्धव ठाकरे यांनी आत्मचिंतन करण्याची आवश्यकता असल्याचे मत व्यक्त केले आहे.

    बावनकुळे बुधवारी प्रसारमाध्यमांशी नागपुरात बोलत होते. ठाकरेंचे खासदार पक्ष सोडत असल्याबद्दल भाजपला या विषयात गोवणे अयोग्य आहे. उद्धव ठाकरे यांनी लोकसभा अध्यक्षांना पत्र देऊन त्यांच्या खासदारांबाबत हालचाली सुरू असल्याची भीती व्यक्त केली आहे. मात्र, या विषयाची संपूर्ण माहिती ठाकरे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाच आहे.

    Maharashtra TimesMaharashtra Politics : श्रीकांत शिंदेंचा पुढाकार, मे महिन्यापासून चर्चा, विलीनीकरणाची इन्साईड स्टोरी, तिघा फुटीर ‘संजय’पैकी एकाला केंद्रात राज्यमंत्रिपद
    आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीला जातील आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होतील, असे केलेल्या वक्तव्याबाबत विचारले असता बावनकुळे म्हणाले, प्रत्येकाला आपली भावना व्यक्त करण्याचा अधिकार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिल्लीला नेण्याबाबतच्या चर्चांवर प्रतिक्रिया देताना बावनकुळे म्हणाले, हे कुणाच्या हातात नाही. मात्र, २०२९पर्यंत महाराष्ट्राला अधिक मजबूत आणि प्रगत राज्य बनविण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस सातत्याने कार्यरत आहेत. त्यामुळे अशा चर्चांना फारसे महत्त्व देऊ नये.

    Maharashtra TimesVidhan Parishad Election: विधान परिषदेच्या 11 जागांसाठी आज मतदान; 22 जूनला निकाल, कोण भिडणार आमने-सामने?
    ही तर महाविकास आघाडीशी गद्दारी – हर्षवर्धन सपकाळ
    शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून सहा खासदारांनी केलेली बंडखोरी ही फक्त उद्धव ठाकरे व त्यांच्या शिवसेनेशी केलेली गद्दारी नाही; तर काँग्रेस महाविकास आघाडीशीसुद्धा त्यांनी गद्दारी केलेली आहे, असा इशारा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिला आहे. जनतेने यांना महायुतीच्या विरोधात मतदान करून विजयी केले, त्यांचा हा विश्वासघात आहे, अशा गद्दारांना यापुढे जनताच धडा शिकवेल, असा इशाराही सपकाळ यांनी दिला.

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

    किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

    पत्रकारितेतील अनुभव
    किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

    शैक्षणिक पात्रता
    किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.… आणखी वाचा