IMD Weather Alert: तीन महिने उन्हाच्या झळा सोसल्या, आता वातावरण थंड करण्यासाठी पावसाने हजेरी लावावी, अशी अपेक्षा पुणेकर व्यक्त करीत आहेत.
Pune Weather Alert(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
म. टा. प्रतिनिधी, पुणे: अनुकूल वातावरणामुळे मान्सूनने मंगळवारीदेखील महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांत आगेकूच केली असून दक्षिण महाराष्ट्रातील सोलापूरच्या पुढे आणि लगतच्या भागात तो पोहोचल्याचं पाहायला मिळालं. पुढील दोन दिवस मान्सूनच्या प्रगतीला अनुकूल वातावरण असेल, असे संकेत भारतीय हवामानशास्त्र विभागाकडून देण्यात आले आहेत. असं असलं ती पुण्यामध्ये मान्सून दाखल होण्यास अजून काही दिवसांची वाट पाहावी लागण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
पुण्यात जूनच्या पहिल्या दहा दिवसांत सरासरी ४९ मिलिमीटर पावसाची नोंद होते. यात मान्सूनपूर्व पावसाचा वाटा मोठा असतो. या वर्षी शहरात दहा दिवसांत पाऊसच पडलेला नाही. त्यामुळे ‘आयएमडी’च्या नोंदवहीत पुण्यासमोर अद्याप शून्याचीच नोंद आहे. याउलट गेल्या वर्षी शहरात संपूर्ण मे महिना पाऊस पडला होता. जून महिन्याचा सरासरी पाऊस एक महिना आधीच बरसला होता. जूनमध्येही पावसाने समाधानकारक हजेरी लावली. या वर्षी मे महिन्यातही मोजकेच काही दिवस वळवाचा पाऊस पडला. जूनच्या पहिल्या आठवड्यातही पावसाने पुणेकरांना निराश केले आहे.
कोकणातील बहुतांश भागात सध्या मान्सून बरसतो आहे, तर राज्याच्या इतर भागांत ढगांच्या गडगडाटासह वळवाचा पाऊस दररोज हजेरी लावतो आहे. पुणे जिल्ह्यातही गेल्या चार दिवसांत वेगवेगळ्या गावांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची नोंद झाली; पण जूनचा आठवडा उलटला तरी पुणे शहरात पाऊस पडलेला नाही. शहरात दोन दिवसांपासून दुपारनंतर वारे वाहत आहेत, त्यामुळे पुणेकरांना उन्हाचे चटके आणि उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे. संध्याकाळी आकाश ढगाळ आणि वाऱ्यांमुळे रस्त्यावर फिरताना सुसह्य वातावरण जाणवते आहे. मात्र, रात्रीच्या तापमानात घट झालेली नाही. या काळातील सरासरीच्या तुलनेत जास्त तापमान नोंदविण्यात येते आहे.
पुण्यात कधी बरसणार पाऊस?
दरम्यान, “पुढील दोन दिवसांत शहर वातावरणात बदल होतील. तापमानात थोडी घट होऊन, दुपारनंतर आकाश अंशतः ढगाळ राहणार आहे. गुरुवारनंतर शहरात ढगांचा गडगडाट आणि वादळी वाऱ्यांसह पाऊस पडणार असल्याची शक्यता आहे,” असं ‘आयएमडी’तील वरिष्ठ हवामानशास्त्रज्ञ डॉ. एस. डी. सानप यांनी म्हटलं आहे.
लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.
पत्रकारितेतील अनुभव अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.
मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU
शैक्षणिक पात्रता अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा