• Wed. Jul 29th, 2026
    Pune Crime : पुण्यात मित्र, बायको अन् नवरा एकाच खोलीत, संशयामुळे कडाक्याचं भांडण, दोस्ताला रुममध्येच संपवलं; पत्नीच्या मदतीनं नको ते केलं

    Pune Crime News : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे. अशातच पुण्यातील शिक्रापूरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेनं एकच खळबळ उडाली आहे.

    पुणे शिक्रापूर रुममधल्या मित्राची हत्या(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    पुणे : पुणे जिल्ह्यातील शिक्रापूरमधून एक अतिशय धक्कादायक आणि थरारक घटना समोर आली आहे. एकाच खोलीत सोबत राहणाऱ्या मित्रानेच आपल्याच मित्राचा गळा दाबून निर्घृण हत्या केल्याचं उघड झालं आहे. इतकेच नाही तर हत्येचा पुरावा लपवण्यासाठी त्याने आपल्या अवघ्या 19 वर्षांच्या पत्नीची मदत घेतली आणि मृतदेह पोत्यात भरून निर्जन ठिकाणी फेकून दिला. शिक्रापूर पोलिसांनी अवघ्या काही तासांत या गुन्ह्याचा छडा लावत पती-पत्नी दोघांनाही बेड्या ठोकल्या आहेत.

    नेमकी घटना काय?

    या संपूर्ण धक्कादायक प्रकरणाचा खुलासा 26 जुलै रोजी दुपारी झाला. जेव्हा शिक्रापूर येथील करंजेनगरच्या एका मोकळ्या मैदानात, झुडपांमध्ये पोत्यात भरलेला एक अज्ञात तरुणाचा मृतदेह स्थानिक नागरिकांना आढळून आला. या घटनेनं संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली होती. मृतदेहाची ओळख पटवणं पोलिसांसमोर मोठं आव्हान होतं. शिक्रापूर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगानं फिरवत सोशल मीडिया आणि गुप्त सूत्रधारांच्या जाळ्याचा वापर केला. अखेर तो मृतदेह गौरव ऊर्फ अक्षय अशोक वायकर (वय 24, मूळ रा. थेऊर, ता. हवेली) या तरुणाचा असल्याचं निष्पन्न झालं.
    Maharashtra TimesCrime News : नवरदेव-नवरी स्टेजवर जाण्याच्या तयारीत, अचानक पोलिसांची एन्ट्री, वधू-वराला थांबवून लग्न रोखलं; छ.संभाजीनगरात काय घडलं?

    मुकेश आणि जान्हवी ताब्यात

    पोलीस तपासात समोर आलेली माहिती थक्क करणारी होती. मृत गौरव हा करंजेनगर येथे त्याचा मित्र मुकेश विठ्ठल सोनवणे आणि मुकेशची पत्नी जान्हवी अनिल पाटोळे (वय 19) यांच्यासोबत रूममेट म्हणून राहत होता. गेल्या काही दिवसांपासून गौरव आणि मुकेश यांच्यात अनैतिक संबंधांच्या संशयावरून कडाक्याचं वाद सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. याच संशयाच्या धाग्यावरून पोलिसांनी तात्काळ मुकेश आणि जान्हवीला ताब्यात घेतलं. या प्रकरणी मृत गौरवच्या आई कांचन अशोक वायकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शिक्रापूर पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, मुकेश आणि जान्हवी या दोन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.

    जीवे मारण्याची धमकी देऊन अत्याचार

    ताथवडे येथे दहा वर्षीय मुलीला जीवे मारण्याची धमकी देऊन तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. या प्रकरणी 61 वर्षीय व्यक्तीविरोधात वाकड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पॉक्सो, भारतीय न्याय संहिता आणि अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. रमजान बन्नूसाब बागवान (वय 61, रा. ताथवडे) असे संशयिताचे नाव आहे.
    Maharashtra TimesTukaram Mundhe: तुकाराम मुंढेंनी पुण्यात आता भेसळखोरांचं कंबरडं मोडलं; चिक्की, सोनपापडीचा लाखोंचा साठा नष्ट, ५ हॉटेल परवाने निलंबित
    या प्रकरणी 30 वर्षीय महिलेने सोमवारी (27 जुलै) वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीला दहा आणि चार वर्षांच्या दोन मुली आहेत. त्यापैकी दहा वर्षीय मुलीला चाकूने पोट फाडीन, अशी धमकी देऊन घरात कोणी नसताना तोंड दाबून संशयिताने स्वतःच्या घरी नेले. त्यानंतर मे 2026 ते 27 जून 2026 या कालावधीत तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. संशयित फिर्यादीच्या चार वर्षीय मुलीलाही तोंड दाबून घेऊन जात असताना एका महिलेने पाहिले, तेव्हा हा प्रकार उघड झाला.‌

    प्रशांत पाटील

    लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.

    प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.

    ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.… आणखी वाचा