• Tue. Jun 16th, 2026

    Abdul Sattar: बँक निवडणुकीत मुलाचा अर्ज बाद; मुख्यमंत्र्यांचं नाव घेत अब्दुल सत्तारांचं मोठं वक्तव्य, पुढील दिशा स्पष्ट

    Abdul Sattar: बँक निवडणुकीत मुलाचा अर्ज बाद; मुख्यमंत्र्यांचं नाव घेत अब्दुल सत्तारांचं मोठं वक्तव्य, पुढील दिशा स्पष्ट

    सुशील राऊत, छत्रपती संभाजीनगर: “जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत माझ्या मुलाचा उमेदवारी अर्ज ज्या कारणावरून रद्द करण्यात आला आहे, त्या संपूर्ण संशयास्पद प्रकाराची माहिती मी स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वतः कायदेतज्ज्ञ आणि अ‍ ॅडव्होकेट आहेत, त्यामुळे त्यांना या प्रकरणाते झालेली घोडचूक समजायला दोन मिनिटेही लागणार नाहीत,” असा ठाम विश्वास शिवसेनेचे नेते आणि आमदार अब्दुल सत्तार यांनी व्यक्त केला आहे.

    अब्दुल सत्तार यांनी मुंबईत आल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना बँकेच्या छाननी प्रक्रियेवर कायदेशीर आक्षेप घेतले. ते म्हणाले, “बँकेने ज्या नियम ५७ चा दाखला देऊन फॉर्म रद्द केला आहे, त्यात अशी कोणतीही तरतूद नाही. एखादी व्यक्ती बँकेचा सदस्य झाल्यानंतर पदाचा गैरफायदा घेत असेल, तरच हा नियम लागू होतो. माझा मुलगा तर अजून केवळ उमेदवार आहे. हा कायदेशीर पेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर मांडणार आहे. ते वकील असल्याने या प्रकरणाचा गाभा आणि त्यातील बेकायदेशीरपणा त्यांना तातडीने लक्षात येईल आणि तिथे आम्हाला निश्चित न्याय मिळेल.”

    “जिल्हा बँकेला आमच्या कुटुंबाने इमारत भाड्याने दिली आहे, हे खरे आहे. मात्र, निवडणूक लढवण्याचे ठरताच मुलाने बँक खाली करण्याची कायदेशीर नोटीस प्रशासनाला दिली होती. उलट, सध्या शेतकऱ्यांना कर्ज वाटप सुरू असल्याने सध्या बँक खाली करू शकत नाही असं म्हणत बँकेनेच आमच्याकडे इमारत खाली करण्यासाठी वेळ मागून घेतला होता. मग आता आमच्यावरच कारवाई कशी होऊ शकते? हीच वस्तुस्थिती मी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसमोर ठेवणार आहे,” असे सत्तार यांनी स्पष्ट केले.

    हा निर्णय अंतिम नाही, आम्ही अपीलात जिंकणार….
    सत्तार यांनी विरोधकांना आणि बँक प्रशासनाला सुनावताना सांगितले की, “बँकेने दिलेला निर्णय हा अंतिम किंवा शेवटचा नाही. या प्रकरणात मोठा संशय असून हे कोणी करायला लावले की स्वतःहून झाले, हे तपासल्याशिवाय मी अधिक बोलणार नाही. पण आम्ही या निर्णयाविरोधात वरिष्ठ पातळीवर अपील करणार आहोत. मुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि कायदेशीर लढाईत आमचा फॉर्म अपीलमध्ये शंभर टक्के मंजूर होईल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

    लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.

    पत्रकारितेतील अनुभव
    अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.

    मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU

    शैक्षणिक पात्रता
    अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed