• Wed. Jun 10th, 2026

    Pune Crime: पुण्यातील हाय प्रोफाइल भागातील स्पा सेंटरवर पोलिसांची धाड; दोन महिलांची सुटका, मॅनेजर अटकेत

    Pune Crime: पुण्यातील हाय प्रोफाइल भागातील स्पा सेंटरवर पोलिसांची धाड; दोन महिलांची सुटका, मॅनेजर अटकेत

    श्रीकृष्ण पांचाळ, पिंपरी- चिंचवड: पिंपरी- चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील हिंजवडी परिसरात सुरू असलेल्या वेश्याव्यवसायावर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई केली आहे. भुजबळ वस्ती येथील ब्ल्यू डायमंड रिलॅक्स स्पा सेंटरवर छापा टाकून दोन पीडित महिलांची सुटका करण्यात आली असून स्पा मॅनेजरला अटक करण्यात आली आहे.

    या प्रकरणी स्पा चालक मारुती ज्ञानेश्वर मुरडे आणि स्पा मॅनेजर वैशाली संतोष चव्हाण यांच्या विरोधात हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापैकी वैशाली चव्हाण हिला पोलिसांनी अटक केली आहे.

    अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक नितीन गीते यांना ब्ल्यू डायमंड रिलॅक्स स्पा सेंटरमध्ये अवैधरित्या वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त रोहिदास पवार आणि सहाय्यक पोलीस आयुक्त विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी डमी ग्राहक पाठवून शहानिशा केली. त्यानंतर सदर ठिकाणी वेश्याव्यवसाय सुरू असल्याचे स्पष्ट झाले.

    या कारवाईत दोन महिलांची सुटका करण्यात आली असून संबंधितांविरोधात अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    दरम्यान, यावर्षी अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाने शहरातील स्पा सेंटरसह एकूण 16 ठिकाणी छापेमारी करून पिटा अंतर्गत गुन्हे दाखल केले आहेत. या 16 गुन्ह्यांमध्ये आतापर्यंत 38 जणांना अटक करण्यात आली असून 37 महिलांची वेश्याव्यवसायातून सुटका करण्यात आली आहे. तसेच, पिंपरी- चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी यावर्षी नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चार स्पा सेंटरवर एक वर्षासाठी बंदी घालण्याची कारवाई केली असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली.

    लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.

    पत्रकारितेतील अनुभव
    अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.

    मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU

    शैक्षणिक पात्रता
    अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed