• Thu. Jun 11th, 2026
    मुंबई, ठाणे, नवी मुंबईकरांना मुख्यमंत्र्यांची मोठी भेट! 28 किमीचा मेट्रो मार्ग अन् गायमुख ते भाईंदर नव्या पुलांना मंजुरी; पाहा संपूर्ण प्लॅन

    Thane-Bhayander Elevated Bridge and Gaimukh Tunnel Project: घोडबंदर मार्गावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी मोठा निर्णय घेण्यात आला आहे. गायमुख-फाउंटन भुयारी मार्ग आणि भाईंदर उन्नत पूल प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे आता मुंबई-ठाणे प्रवास आता अधिक जलद होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    ठाणे : मुंबई महानगर प्रदेशातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी महत्त्वाचा मानला जाणारा ठाणे-घोडबंदर मार्गावरील गायमुख ते फाउंटन हॉटेल भुयारी मार्ग आणि फाउंटन हॉटेल ते भाईंदर उन्नत पूल प्रकल्पाला अखेर हिरवा कंदील मिळाला आहे. हे दोन्ही प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर पश्चिम मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, नाशिक आणि गुजरातकडे जाणारा प्रवास अधिक जलद व सुलभ होणार असल्याचा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

    मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समितीच्या मंत्रालयातील बैठकीत तब्बल २२ हजार ६११ कोटी रुपयांच्या विविध प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली. या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

    उपसा मिळणार घोडबंदर मार्गाला

    या प्रकल्पांतर्गत गायमुख ते फाउंटन हॉटेल दरम्यान ५.८६ किलोमीटर लांबीचा सहा पदरी भुयारी मार्ग उभारला जाणार आहे. तर फाउंटन हॉटेल ते भाईंदर दरम्यान ९.५८ किलोमीटर लांबीचा सहा पदरी उन्नत पूल उभारण्यात येणार आहे. भुयारी मार्गाचे बांधकाम अत्याधुनिक टीबीएम तंत्रज्ञानाच्या साहाय्याने करण्यात येणार असून त्याचा व्यास १४ मीटर असेल. पुढील पाच वर्षांत हा प्रकल्प पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

    Maharashtra TimesChandrapur News: हसता खेळता ग्रुप सेल्फी काढला, मोबाईल काठावर ठेवला अन् घात झाला! वर्धा नदीत 5 मित्रांचा दुर्दैवी मृत्यू; 15 ते 20 वर्षांच्या मुलांच्या जाण्याने हळहळ

    ताशी १०० किमी वेगाने धावणार वाहतूक

    वसई खाडीला समांतर उभारण्यात येणाऱ्या उन्नत पुलावर वाहनांना ताशी १०० किलोमीटर वेगाने प्रवास करता येणार आहे. त्यामुळे घोडबंदर मार्गावरील वाहतुकीचा ताण कमी होण्यास मदत होणार आहे. विशेषतः ठाणे आणि गुजरातच्या दिशेने जाणाऱ्या जड वाहनांसाठी पर्यायी मार्ग उपलब्ध होणार असल्याने प्रवासाचा वेळही मोठ्या प्रमाणात वाचणार आहे.

    सार्वजनिक-खासगी भागीदारीतून प्रकल्प

    हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प सार्वजनिक-खासगी भागीदारीच्या ‘बांधा-वापरा-हस्तांतरित करा’ (बीओटी) तत्त्वावर राबविण्यात येणार आहे. यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून व्हायबिलिटी गॅप फंडिंग देण्यात येणार आहे. तसेच प्रकल्प परिसरासाठी एमएमआरडीएला विशेष नियोजन प्राधिकरणाचा दर्जा देण्यासही मान्यता देण्यात आली आहे.

    नवी मुंबई मेट्रो विस्तारालाही मंजुरी

    याच बैठकीत सिडकोच्या नवी मुंबई मेट्रो मार्ग १ए (सागर संगम ते सीबीडी बेलापूर) आणि मेट्रो मार्ग २ (पेंधर ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ टी-४) विस्तार प्रकल्पांनाही मंजुरी देण्यात आली. या निर्णयामुळे सागर संगम ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ असा सलग २८ किलोमीटरचा मेट्रो मार्ग उपलब्ध होणार आहे.

    या विस्तारामध्ये मार्ग १ए वर दोन तर मार्ग २ वर ११ स्थानकांचा समावेश आहे. भविष्यात दररोज सुमारे १२ लाख प्रवासी या मेट्रो सेवेचा लाभ घेतील, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे नवी मुंबईतील सार्वजनिक वाहतुकीला मोठी चालना मिळणार असून विमानतळाशी जोडणीही अधिक सक्षम होणार आहे.

    सुनिल लाटे

    लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.… आणखी वाचा