• Wed. Jul 29th, 2026
    Pune News : पुणे एक कोटीचं दरोडा प्रकरण; डोळ्यात मिरचीची पूड फेकून बॅगा हिसकावल्या, चोरीला पोलिसांचीच साथ; कारवाईनंतर वर्दी अन् पैसेही गेले

    Pune Crime News : अखेर पुणे ग्रामीण पोलिसांनी कठोर कारवाई करत एक कोटी दरोडा प्रकरणात पोलीस हवालदार प्रमिला निकम आणि पोलीस नाईक अजित मेस्त्री अखेर निलंबित केलं आहे.

    पुणे राजगड प्रमिला निकम अजित मेस्त्री निलंबित(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    पुणे : व्यापाऱ्याला धमकावून एक कोटी रुपये लुटण्याच्या प्रयत्नात पुणे ग्रामीण पोलीस दलातील कर्मचाऱ्यांचाच थेट सहभाग असल्याचं उघडकीस आल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. या गंभीर प्रकरणात निष्काळजीपणा आणि गुन्हेगारी कटात सहभाग आढळल्यानं पोलीस हवालदार प्रमिला निकम आणि पोलीस नाईक अजित मेस्त्री या दोघांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

    नेमकी घटना काय ?

    तळेगाव दाभाडे येथील व्यापारी हर्षवर्धन पवार हे त्यांचे शेजारी किरण आपटे यांच्या मध्यस्थीने ‘चव्हाण एंटरप्रायजेस’ला एक कोटी रुपयांची रोख रक्कम देण्यासाठी 18 जुलै रोजी पुण्यात आले होते. नऱ्हे येथील एचडीएफसी बँकेत ही रक्कम जमा करायची असल्यानं पवार, आपटे आणि चालक गाडीने निघाल्यानंतर चालकानं नियोजित मार्ग बदलून गाडी नऱ्हे पुलावर नेली.
    Maharashtra TimesPune Crime : पुण्यात मित्र, बायको अन् नवरा एकाच खोलीत, संशयामुळे कडाक्याचं भांडण, दोस्ताला रुममध्येच संपवलं; पत्नीच्या मदतीनं नको ते केलं
    त्याचवेळी पाठलाग करणाऱ्या एका दुचाकीवरील दोन अज्ञात व्यक्तींनी गाडी अडवली. ‘आम्ही पोलीस आहोत, तुमच्याकडे बेकायदेशीर रक्कम आहे,’ असं सांगत त्यांनी गाडीतील पैशांच्या बॅगा हिसकावण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान व्यापाऱ्याच्या डोळ्यात मिरचीची पूड फेकण्यात आली. किरण आपटे हे सुमारे 73 लाख 50 हजारांची एक बॅग वाचवून गाडीतून उतरण्यात यशस्वी झाले, मात्र पवार गाडीतच अडकले.

    प्रकरणावर पडदा टाकण्याचा कट

    दरोडेखोरांपैकी एकानं चालकाला धमकावून गाडी थेट खेड-शिवपूर पोलीस चौकीत नेली. तेथे सुट्टीवर असतानाही खाकी वर्दीत हजर असलेल्या महिला पोलीस हवालदार प्रमिला निकम आणि पोलीस नाईक अजित मेस्त्री यांनी तक्रारदार व्यापाऱ्यालाच अटकेची भीती दाखवून दबावात आणण्याचा प्रयत्न केला. तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, एक तोतया पत्रकार आशिष तिवारी याने गाडीत लपवून ठेवलेली सुमारे 20 लाख रुपयांची रोकड बाहेर काढण्यासाठी हवालदार निकम यांनी मदत केली. तसेच, केवळ साडेदहा लाख रुपये अधिकृत मुद्देमाल म्हणून दाखवून उर्वरित रकमेची विल्हेवाट लावण्याचा आणि संपूर्ण प्रकरणावर पडदा टाकण्याचा कट आखण्यात आला होता.
    Maharashtra TimesMahim Accident : अपघाताचा आवाज ऐकून पती घराबाहेर, पत्नीला बाईकने फरफटत नेलेलं, अक्कलकोटला निघण्यापूर्वी माहिमच्या कुटुंबावर शोककळा
    घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी तातडीने खेड-शिवपूर चौकीत धाव घेतली. वरिष्ठांच्या हस्तक्षेपामुळे व्यापाऱ्याची गायब झालेली काही रक्कम परत मिळवण्यात आली. याप्रकरणी नऱ्हे पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून सुरुवातीला वगळण्यात आलेली पोलीस कर्मचारी व कथित पत्रकारांची नावे तपासाअंती पुरवणी गुन्ह्यात समाविष्ट करण्यात आली आहेत.
    Maharashtra TimesCrime News : नवरदेव-नवरी स्टेजवर जाण्याच्या तयारीत, अचानक पोलिसांची एन्ट्री, वधू-वराला थांबवून लग्न रोखलं; छ.संभाजीनगरात काय घडलं?

    सहाजण सध्या फरार

    या प्रकरणात आत्तापर्यंत 10 जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. तर तोतया पत्रकार आशिष तिवारी याच्यासह चौघांना अटक देखील करण्यात आली आहे. दरम्यान, निलंबित पोलीस हवालदार प्रमिला निकम, पोलीस नाईक अजित मेस्त्री यांच्यासह सहाजण सध्या फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. काही दिवसांपूर्वीच कामशेत पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांवर खंडणीचा आरोप झाला असतानाच, आता राजगड पोलीस ठाण्याशी संबंधित कर्मचाऱ्यांच्या या कारनाम्यामुळे पुणे ग्रामीण पोलीस दलाची प्रतिमा प्रचंड मलीन झाली आहे.

    प्रशांत पाटील

    लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.

    प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.

    ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.… आणखी वाचा