Marathi Live News: मुंबईत ‘बेस्ट’ बसगाड्यांचे अपघातसत्र सुरूच असून, सोमवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास दादर प्लाझा सिनेमागृहाजवळ इलेक्ट्रिक एसी बस अनेक वाहनांना धडकून भीषण अपघात झाला. या अपघातात एकाचा मृत्यू झाला असून, सहा जण जखमी झाले. हँन्ड ब्रेक सोडताच ॲक्सीलरेटरवर पाय दिल्याने हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज ‘बेस्ट’च्या अधिकाऱ्यांनी वर्तवला. मात्र, ‘ब्रेक फेल’ झाल्याने हा अपघात झाल्याचा दावा चालकाने केला आहे.दरम्यान, तळकोकणात दोन दिवसांपूर्वी दाखल झालेला मान्सून आता पुढे सरकला आहे. रत्नागिरी जिल्ह्यात सोमवारी मान्सून दाखल झाला आहे. सोमवारी सकाळी व सायंकाळी जिल्ह्यात मंडणगडपासून राजापूरपर्यंत सर्व तालुक्यांमध्ये पाऊस झाला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यात हर्णेपर्यंत मान्सून दाखल झाला आहे.
दिवसभरातील ताज्या बातम्या, ब्रेकिंग न्यूज पाहा फक्त एका क्लिकवर
