Pune Made in Pakistan Label Bedsheet : पुण्यातील एका महिलेला चादरीवर असलेलं ‘मेड इन पाकिस्तान’ असलेलं लेबल दिसून आलं. त्यानंतर याबाबत एक व्हिडिओ पोस्ट करुन या महिलेनं अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.
बेडशीट लेबल मेड इन पाकिस्तान व्हिडिओ(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
पुणे (पिंपरी-चिंचवड) : ‘पुणे तिथे काय उणे’…पुण्याक कधी काय आणि कोणती घटना समोर येईल, याचा काही नेम नाही. असाच एक धक्कादायक प्रकार पिंपरी-चिंचवड शहरातील श्री. मोरया गोसावी मंदिराजवळ संकष्टी चतुर्थीनिमित्त भरणाऱ्या यात्रेत समोर आला आहे. या यात्रेत ‘मेड इन पाकिस्तान’च्या वस्तू विक्रीसाठी आल्याचा दावा एका महिलेनं केला आहे. या संदर्भातील एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात व्हायरल होत असून, यामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. व्हिडिओमध्ये संबंधित महिला याच यात्रेतून खरेदी केलेली एक चादर/बेडशीट दाखवत आहे. ही चादर धुतल्यानंतर त्याच्या एका कोपऱ्यात एक लेबल आढळल्याचं ती सांगते. त्या लेबलवर ‘Made in Pakistan’ असा इंग्लिशमध्ये स्पष्ट उल्लेख असल्याचा दावा तिने केला आहे.
व्हायरल व्हिडिओमध्ये महिलेचा तीव्र संताप
या घटनेनंतर स्थानिक बाजारपेठांमध्ये विकल्या जाणाऱ्या वस्तू मूळ कुठून येतात याबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. यात्रेत आणि रस्त्यावरील स्टॉल्सवर विकल्या जाणाऱ्या वस्तूंची कोणतीही तपासणी होते का? असा सवाल आता नागरिकांकडून विचारला जात आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये संबंधित महिलेनं तीव्र संताप व्यक्त केला आहे. देशात पाकिस्तानी वस्तूंवर विविध प्रकारचे निर्बंध असताना, अशा वस्तू स्थानिक बाजारपेठेत पोहोचतातच कशा? असा प्रश्न देखील या महिलेनं उपस्थित केला आहे. (Made in Pakistan)
Sachin Ghaywal : भावाच्या मदतीनेच सचिन घायवळ फरार, पोलीस तपासात मोठी माहिती समोर; तुरुंगात भाऊ निलेश घायवळबाबत मोठा खुलासा
सोशल मीडियावर या व्हिडिओवरून जोरदार चर्चा
दरम्यान, सोशल मीडियावर या व्हिडिओवरून जोरदार चर्चा सुरू झाली आहे. काहींनी या प्रकरणाची तातडीने चौकशी करण्याची मागणी केली आहे, तर काहींनी वस्तूंच्या लेबलची पूर्ण पडताळणी करूनच अंतिम निष्कर्षावर यावं, अशी भूमिका घेतली आहे. या पार्श्वभूमीवर, नागरिकांनी कोणतीही वस्तू खरेदी करण्यापूर्वी तिच्यावरील उत्पादन तपशील, उत्पादक कंपनीचं नाव आणि मूळ देश याची खात्री करावी, असं आवाहन केलं जात आहे. Crime News : कॉलेज विद्यार्थ्याकडून लाच घेतली, कोड वर्डप्रमाणे आळस दिला, API सह पोलीस कॉन्स्टेबल रंगेहाथ जाळ्यात
संबधित वस्तू नेमकी कुठून आली?
हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला असला, तरी संबंधित वस्तू नेमकी कुठून आली, ती अधिकृतपणे आयात झाली होती की नाही, तसेच स्थानिक विक्रेत्याची यावर काय बाजू आहे, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे संबंधित प्रशासकीय यंत्रणांनी या प्रकाराची सखोल चौकशी करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.
प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.
‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.… आणखी वाचा