• Thu. Sep 10th, 2026

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सुखजीत स्टार्च अँड केमिकल्स समवेत ‘मेगा प्रोजेक्ट’ उभारणीसाठी सामंजस्य करार – महासंवाद

ByMH LIVE NEWS

Sep 8, 2026

मुंबई, दि. ८ :- येवला औद्योगिक क्षेत्रात ७६० रुपये कोटी गुंतवणूकीच्या माध्यमातून  ३,२०० रोजगारांच्या निर्मितीला चालना देण्यात येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत उद्योग विभाग आणि सुखजीत स्टार्च अँड केमिकल्स यांच्यामध्ये ‘मेगा प्रोजेक्ट’ उभारणीसाठी सामंजस्य करार करण्यात आला.

सह्याद्री अतिथिगृह येथे झालेल्या कार्यक्रमात सुखजीत स्टार्च अँड केमिकल्सच्या सामंजस्य कराराचे हस्तांतरण झाले. यावेळी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, उद्योग मंत्री उदय सामंत, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिपेंद्रसिंह कुशवाह, आमदार समीर भुजबळ, सुखजीत स्टार्च अँड केमिकल्सचे भावदीप सरडाना उपस्थित होते.

विविध मूल्यवर्धित उत्पादनांच्या निर्मितीसाठी मेगा प्रोजेक्ट

नाशिक जिल्ह्यातील येवला औद्योगिक क्षेत्रात मका प्रक्रिया व त्यापासून विविध मूल्यवर्धित उत्पादने निर्मिती करणाऱ्या मे. द सुखजीत स्टार्च अँड केमिकल्स लिमिटेडच्या प्रस्तावित प्रकल्पाला ‘मेगा प्रोजेक्ट’चा दर्जा आहे. या प्रकल्पासाठी कंपनीकडून ₹७६० कोटींची गुंतवणूक प्रस्तावित असून, त्यातून सुमारे ३,२०० व्यक्तींना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. यामध्ये सुमारे २०० थेट आणि ३,००० अप्रत्यक्ष रोजगारांचा समावेश आहे.

कंपनीने येवला औद्योगिक क्षेत्र, तालुका येवला, जिल्हा नाशिक येथे मका स्टार्च, डेक्स्ट्रोज अॅनहायड्रस, डेक्स्ट्रोज मोनोहायड्रेट, सॉर्बिटॉल ७० टक्के सोल्युशन, ग्लुकोज सिरप, माल्टोज सिरप, मका ग्लुटेन, मका जर्म, मका तेल, मका ब्रॅन/कॅटल फीड तसेच मका ऑइल केक आदी उत्पादनांच्या निर्मितीची क्षमता आहे.

या प्रकल्पामुळे नाशिक जिल्ह्यातील मका उत्पादक शेतकऱ्यांना बाजारपेठ उपलब्ध होण्याबरोबरच मका प्रक्रियेला आणि मूल्यवर्धनाला चालना मिळण्याची अपेक्षा आहे. येवला परिसरातील औद्योगिक विकास, स्थानिक रोजगारनिर्मिती आणि कृषीआधारित उद्योगांना चालना देण्याच्या दृष्टीने हा प्रकल्प महत्वपूर्ण ठरणार आहे.

00000

किरण वाघ/विसंअ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed