• Wed. Sep 9th, 2026

व्हेनेझुएलाच्या कार्यवाहक राष्ट्राध्यक्षा डेल्सी रॉड्रिग्ज यांनी केली टाटा मोटर्सच्या नवीन ईलेक्ट्रिक वाहनांची पाहणी – महासंवाद

ByMH LIVE NEWS

Jun 6, 2026
व्हेनेझुएलाच्या कार्यवाहक राष्ट्राध्यक्षा डेल्सी रॉड्रिग्ज यांनी केली टाटा मोटर्सच्या नवीन ईलेक्ट्रिक वाहनांची पाहणी – महासंवाद

इलेक्ट्रिक वाहनांच्या क्षेत्रातील नवीन संधींबाबत चर्चा

मुंबई, दि 6 :- व्हेनेझुएलाच्या बोलिव्हियन प्रजासत्ताकाच्या कार्यवाहक राष्ट्राध्यक्षा डेल्सी रॉड्रिग्ज यांनी बॉम्बे हाऊस येथे टाटा समूहाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट घेतली. राष्ट्राध्यक्षा डेल्सी रॉड्रिग्ज यांनी बॉम्बे हाऊस येथे टाटा मोटर्सच्या नवीन ईलेक्ट्रिक वाहनांची पाहणी करुन माहिती घेतली.

टाटा समूहाच्या वतीने टाटा मोटर्सचे  व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी  गिरीश वाघ, तसेच वरिष्ठ अधिकारी यांनी राष्ट्राध्यक्षा डेल्सी रॉड्रिग्ज यांचे स्वागत केले. यावेळी राष्ट्राध्यक्षा डेल्सी रॉड्रिग्ज यांनी इलेक्ट्रिक वाहनांच्या क्षेत्रातील आधुनिक आणि प्रगत तंत्रज्ञानाबाबत तसेच या क्षेत्रातील नवीन संधींबाबत टाटा समूहाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा केली. टाटा एक्स्पिरिएंन्स सेंटर येथे त्यांनी टाटा समूहाच्या वाटचालीसंदर्भातही त्यांनी माहिती घेतली.

000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed