• Sat. Jun 6th, 2026

    ना चमचे-प्लेट, ना बिर्याणी, ना उंदीरनाशक; कशातही झिंक फॉस्फाईड नाही, डोकाडिया मृत्यू प्रकरणी पोलिसांसमोर चार नवे अँगल

    ना चमचे-प्लेट, ना बिर्याणी, ना उंदीरनाशक; कशातही झिंक फॉस्फाईड नाही, डोकाडिया मृत्यू प्रकरणी पोलिसांसमोर चार नवे अँगल

    Pydhonie Dokadia Family Death Case : पोलिसांना तपासणी अहवाल प्राप्त झाला असून डोकाडिया कुटुंबाच्या निवासस्थानावरुन जप्त करण्यात आलेला चाकू, तीन मोठे चमचे, चार ताटं, कच्चे तांदूळ, चिकन बिर्याणी आणि उंदीर पळवून लावणाऱ्या स्प्रेची बाटली या सर्व वस्तूंमधील ‘झिंक फॉस्फाइड’च्या समावेशाबाबत स्पष्टता आली आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    मुंबई : दक्षिण मुंबईतील पायधुनी परिसरात राहणाऱ्या डोकाडिया कुटुंबातील चौघांच्या मृत्यू प्रकरणाचे गूढ अधिकाधिक गडद होताना दिसत आहे. कलिंगडाच्या सेवनाने चौघांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक संशय होता. आता तर डोकाडियांच्या घरातून जप्त केलेल्या सुरी, प्लेट, भात, चिकन बिर्याणी तसेच हर्बल उंदीर नाशकात विषारी झिंक फॉस्फाईडचा अंश नसल्याचे नव्या फॉरेन्सिक चाचणी अहवालात समोर आले आहे.

    व्हिसेरात ‘झिंक फॉस्फाइड

    पहिल्या न्यायवैद्यक अहवालात कलिंगडामध्ये तसेच त्यांच्या शरीराच्या अंतर्गत अवयवांमध्ये (व्हिसेरा) ‘झिंक फॉस्फाइड’ आढळून आले होते. त्यामुळे विषबाधेने चौघांचा मृत्यू झाल्याचे दर्शवत होते. उंदरांचा नायनाट करण्यासाठी सामान्यतः वापरले जाणारे विष कलिंगडामध्ये कसे आले, याचा शोध पोलीस घेत आहेत. दुसऱ्या फॉरेन्सिक चाचण्यांमुळे हे गूढ उकलण्यास मदत होईल, अशी त्यांना आशा होती.

    Maharashtra TimesDelhi Fire : माझं कर्तव्य होतं ते! हॉटेलात आग, व्यापाऱ्याने लोकांच्या सुटकेसाठी गाद्या पसरल्या, दोन लाखांचं नुकसान, पण 8 जीव वाचले!

    सव्वा महिन्यापूर्वी चौघांचा मृत्यू

    २६ एप्रिलच्या सकाळी ४० वर्षीय अब्दुल्ला डोकाडिया, त्यांची पत्नी नसरीन (३५) आणि दोन मुली – आयेशा (१६) आणि झैनब (१३) यांचा रुग्णालयात मृत्यू झाला. त्यांनी आदल्या रात्री आपल्या घरी पाच इतर नातेवाईकांसोबत जेवणात चिकन बिर्याणी खाल्ली होती. तर मध्यरात्रीनंतर चौघांनीच कलिंगड खाल्ले होते.

    मामा जयंत पाटील यांना फोन, तर शरद पवारांची भेट घेणार; बिनविरोध होताच प्राजक्त तनपुरेंची प्रतिक्रिया

    इतर वस्तूंमध्ये झिंक फॉस्फाइड नाही

    “पायधुनी येथील निवासस्थानावरुन जप्त करण्यात आलेला स्वयंपाकघरातील चाकू, स्वयंपाकाचे तीन मोठे चमचे, चार ताटं, कच्चे तांदूळ, चिकन बिर्याणी आणि उंदीर पळवून लावणाऱ्या स्प्रेची बाटली पोलिसांनी तपासणीसाठी पाठवली होती,” अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली. या आठवड्यात पोलिसांना तपासणीचा अहवाल प्राप्त झाला, ज्यामध्ये या सर्व वस्तूंमध्ये ‘झिंक फॉस्फाइड’ नसल्याचे (चाचणीचा निकाल ‘निगेटिव्ह’ आल्याचे) स्पष्ट झाले.

    Maharashtra TimesKolhapur Accident : मुंबईकर कुटुंबाने कोल्हापुरात घर बांधलं, सुट्टीत गावी मुक्काम, टेम्पोखाली चिरडून चौघांचा मृत्यू, वृद्ध आजीवर वाईट वेळ

    चार अँगलने तपास

    आता पोलीस या प्रकरणाचा चार वेगवेगळ्या दृष्टिकोनांतून पुन्हा तपास करत आहेत: सामूहिक हत्या, कुटुंबीयांची हत्या करुन जीव देणे, सामूहिक आयुष्य संपवणं आणि अपघाती मृत्यू. “आर्थिक बाबींचाही तपास केला जात आहे,” असे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. पोलीस अजूनही झैनबच्या शवविच्छेदन अहवालाची आणि कुटुंबातील सदस्यांच्या फोनच्या सायबर विश्लेषण अहवालांची वाट पाहत आहेत.

    अनिश बेंद्रे

    लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.

    पत्रकारितेतील अनुभव
    अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.

    पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.

    अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.

    शैक्षणिक पात्रता
    अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.… आणखी वाचा