Prajakta Tanpure: माझ्या राजकारणाची सुरुवातही नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदापासून झाली असल्याने तळागाळातील प्रश्नांची मला पूर्ण जाण असल्याचं तनपुरे म्हणाले.
जयंत पाटलांचे भाचे भाजपकडून आमदार झाले; बिनविरोध निवड होताच शरद पवारांबद्दल महत्त्वाचं बोलले(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
अनिकेत यादव, अहिल्यानगर: अहिल्यानगर स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीत बिनविरोध विजयी झाल्यानंतर नवनिर्वाचित आमदार प्राजक्त तनपुरे यांनी पक्षाचे भार मानले आहेत. मात्र त्याचवेळी आपले मामा आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांच्याशी फोनवर संवाद साधणार असल्याचं सांगितलं आहे. तसंच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेणार असल्याची माहितीही तनपुरे यांनी दिली आहे. भाजपच्या तिकिटावर विजय मिळवलेल्या तनपुरेंच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात अनेक तर्क-वितर्कांना सुरुवात झाली आहे.
प्राजक्त तनपुरे म्हणाले की, ज्या चारही उमेदवारांनी अर्ज भरले होते आणि नंतर मोठ्या मनाने माघार घेतली त्या सर्वांचे मी मनापासून आभार मानतो. त्यांच्या निर्णयामुळे ही निवडणूक बिनविरोध झाली आणि माझा विजय शक्य झाला. भाजप नेतृत्वावर पूर्ण विश्वास व्यक्त करताना तनपुरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे विशेष आभार मानले. भारतीय जनता पक्षाने माझ्यावर विश्वास ठेवून उमेदवारी दिली, संधी दिली. त्या विश्वासाला न्याय देण्यासाठी पूर्ण ताकदीने काम करणार असे तनपुरे यांनी ठामपणे सांगितले.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रश्नांवर आक्रमक भूमिका घेण्याचे संकेत देत प्राजक्त तनपुरे पुढे म्हणाले की, “अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्व नगरपालिका, नगरपंचायती आणि महानगरपालिकांतील नगरसेवकांना सांगू इच्छितो की स्थानिक स्वराज्य संस्थांचे जे काही प्रश्न असतील ते सभागृहात मांडण्याचा आणि १०० टक्के सोडवण्याचा प्रयत्न करेन. “
शरद पवारांविषयी काय म्हणाले तनपुरे?
प्राजक्त तनपुरे यांनी भाजपमधून विजय मिळवल्यानंतर मामा जयंत पाटील आणि आपल्या आधीच्या पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचा केलेला उल्लेख चर्चेचा विषय ठरला आहे. भाजपमध्ये प्रवेश करूनही तनपुरे यांनी जुने राजकीय संबंध कायम असल्याचे दाखवत थोड्याच वेळात जयंत पाटील यांना फोन करणार आणि लवकरच शरद पवारांची भेट घेणार असे स्पष्ट सांगितले. भाजपच्या तिकिटावर विधान परिषदेत एंट्री आणि त्यानंतर लगेचच पवारांशी भेटीचे संकेत तनपुरे यांनी दिल्यामुळे आता अहिल्यानगरच्या राजकारणात पुढे नेमके काय घडणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.
पत्रकारितेतील अनुभव अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.
मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU
शैक्षणिक पात्रता अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा