• Tue. Jun 16th, 2026
    गडचिरोली जिल्ह्यातील दारुबंदी उठवा! राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धर्मरावबाबा आत्राम यांची मागणी

    Lift Ban On Liquor In Gadchiroli: दारुबंदी उठवण्याच्या मागणीसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

    धर्मराव बाबा आत्राम(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    म. टा. प्रतिनिधी, नागपूर: ‘गडचिरोली जिल्ह्यातील दारुबंदी उठवावी,’ अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी केली आहे. या मागणीसंदर्भात चर्चा करण्यासाठी आत्राम हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याची माहिती आहे. आत्राम यांच्या या मागणीला काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांनीही समर्थन दिले आहे.

    पुण्यात विषारी दारूमुळे वीसपेक्षा अधिक नागरिकांचे बळी गेल्यानंतर दारुबंदीचा विषय ऐरणीवर आला आहे. केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी हातभट्टीची दारू अधिकृत करण्याची मागणी केली आहे. त्या पार्श्वभूमीवर आत्राम यांनी दारुबंदीबाबत मत व्यक्त केले आहे. ‘गेल्या ४० वर्षांपासून गडचिरोली जिल्ह्यात दारुबंदी आहे. परंतु, या बंदीने काहीही साध्य झालेले नाही. वर्धा जिल्ह्यात दारुबंदी आहे. मात्र, तिथेही दारू मोठ्या प्रमाणात विकली जाते. गडचिरोलीत आता उद्योग येऊ लागले आहेत. या ठिकाणी रोजगारनिर्मिती होत आहे. त्यामुळे दारुबंदी कायम ठेवून काहीही साध्य होणार नाही,’ असे आत्राम म्हणाले.

    Maharashtra TimesAdhik Maas : भाविकांच्या देणगीतून साकारले 750 किलोचे सिंहासन, अधिकमासात टेकडी गणपतीला भव्य सुवर्णसाज
    ‘गरीब आदिवासींना महागडी दारू घेऊन प्यावी लागते. त्यामुळे ही बंदी उठवा. मोहाच्या दारूला कायदेशीर करा. आदिवासी संस्कृतीत जन्म, लग्न, मृत्यू अशा वेळी मोहाची दारू लोक पितात,’ असेही आत्राम म्हणाले.

    नागपुरात Atul Londhe यांनी उमेदवारी अर्ज भरला, पहिली प्रतिक्रिया काय?

    ‘दारुबंदीमुळे व्यसनमुक्ती होत नाही’
    दरम्यान, काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांनीही आत्राम यांना पाठिंबा दिला आहे. ‘मी चंद्रपुरातील दारूबंदी उठवली. जगात आणि देशात दारू विक्री सुरू आहे. ज्या राज्यांनी दारूबंदी केली त्यांनाही ती उठवावी लागली. गडचिरोलीत आदिवासी व्यक्तींना मोहफूल दारू पाडून पिण्याचा अधिकार आहे. दारूबंदीमुळे माणूस व्यसनमुक्त होणार नाही. त्यामुळे यावर होणारी चर्चा ही फालतू चर्चा आहे. विकसित देशांमध्ये या गोष्टीला पूर्णतः मोकळीक आहे. त्यामुळे धर्मरावबाबा आत्राम यांच्या मागणीला माझे समर्थन आहे,’ असे वडेट्टीवार म्हणाले.

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

    किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

    पत्रकारितेतील अनुभव
    किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

    शैक्षणिक पात्रता
    किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.… आणखी वाचा