• Fri. Jun 5th, 2026

    Monsoon News: पावसाचा पॅटर्न बदलणार, दुष्काळ अन् उष्णतेची लाट! अल निनोचा प्रभाव वाढवणार जगाचं टेन्शन, हवामान संघटनेची चिंताजनक भविष्यवाणी

    Monsoon News: पावसाचा पॅटर्न बदलणार, दुष्काळ अन् उष्णतेची लाट! अल निनोचा प्रभाव वाढवणार जगाचं टेन्शन, हवामान संघटनेची चिंताजनक भविष्यवाणी

    मुंबई: देशभरात यंदा उष्णतेच्या लाटेने नागरिकांना हैराण केल्याचं पाहायला मिळालं. मान्सूनच्या आगमनादेखील विलंब झाल्याने उष्णतेने होरपळलेल्या नागरिकांना दिलासा मिळण्यास आणखी काही दिवस वाट पाहावी लागणार आहे. मान्सूनचे आगमन लांबणीवर पडल्याने शेतकरी चिंतेत असतानाच जागतिक हवामान संघटनेकडून (WMO) चिंता वाढवणारी माहिती देण्यात आली आहे. जगभरात वातावरण बदलामुळे मोठं संकट निर्माण झालं असून अल निनोच्या सक्रियतेबाबत वैज्ञानिकांकडून गंभीर इशारा देण्यात आला आहे.

    रॉयटर्सच्या वृत्तानुसार, अल निनोचा प्रभाव वेगाने वाढण्याची शक्यता असून परिणामी मान्सून पॅटर्न बदलणार आहे. जून ते ऑगस्ट या कालावधीत अल निनोचा प्रभाव तयार होण्याची शक्यता ८० टक्क्यांपर्यंत असून नोव्हेंबर महिन्यापर्यंत अल नीनोचा प्रभाव पाहायला मिळू शकतो. वातावरणीय बदलामुळे अल निनोचा परिणाम अधिकच तीव्रतेने जाणवण्याची शक्यता आहे. यामुळे काही भागांमध्ये दुष्काळ, उष्णतेची लाट तर काही ठिकाणी अतिवृष्टी आणि पुराचा सामना करावा लागू शकतो.

    अल निनो म्हणजे नक्की काय?

    जनसामान्यांच्या जीवनावर थेट परिणाम करणारा अल निनो हा दर दोन ते सात वर्षांनी तयार होणारा वातावरणाचा पॅटर्न आहे. या स्थितीत प्रशांत महासागराचे पाणी गरम होते, ज्यामुळे जागतिक तापमानवाढ होते आणि पावसाचा पॅटर्नही बदलून जातो.

    शास्त्रज्ञांनी केलेल्या दाव्यानुसार, पृथ्वीचे तापमान अलीकडच्या काळात १.३ अंश सेल्सिअसने वाढलं असून यामुळे अल निनोचा प्रभाव आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. अल निनो आणि तापमानवाढीमुळे उष्णतेची लाट, दुष्काळ, अतिवृष्टी आणि जंगलांमध्ये आग लागण्याच्या घटनांमध्ये वाढ होण्याचा धोका आहे.

    दरम्यान, यंदा अल निनोचा प्रभाव मान्सूनच्या आगमनावर झालेला असतानाच पुढील वर्षी आणखी विदारक परिणाम पाहायला मिळू शकतात. २०२७ हे आतापर्यंतचं सर्वांत उष्णतेचं वर्ष ठरण्याची शक्यता जागतिक हवामान संघटनेकडून वर्तवण्यात आली आहे.

    लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.

    पत्रकारितेतील अनुभव
    अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.

    मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU

    शैक्षणिक पात्रता
    अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed