• Sat. Jun 6th, 2026

    Supriya Sule: काँग्रेसचे नेते पवारांच्या राष्ट्रवादीवर संतापले, सुप्रिया सुळेंसमोर जाहीर नाराजी; पुण्यात मविआच्या बैठकीत नेमकं काय घडलं?

    Supriya Sule: काँग्रेसचे नेते पवारांच्या राष्ट्रवादीवर संतापले, सुप्रिया सुळेंसमोर जाहीर नाराजी; पुण्यात मविआच्या बैठकीत नेमकं काय घडलं?

    म. टा. प्रतिनिधी, पुणे: पुणे स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीची एकजूट दाखविण्यासाठी मंगळवारी काँग्रेस भवन येथे खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. मात्र, व्यासपीठावर ऐक्याचे संदेश दिले जात असताना बंद दाराआड झालेल्या चर्चेत काँग्रेस नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शप) पक्षाच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केल्याची चर्चा आहे.

    नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकीतील कटू अनुभव, काँग्रेसविरोधात उभे राहिलेले ‘राष्ट्रवादी’चे उमेदवार हे मुद्दे काही नगरसेवकांनी सुप्रिया सुळे यांच्यासमोर उपस्थित केले. त्यामुळे ‘मविआ’तील धुसफूस संपली नसल्याचे स्पष्ट झाले.

    अनेक नगरसेवकांनी गत निवडणुकांतील अनुभव मांडताना नाराजी व्यक्त केली. महाविकास आघाडीचा भाग असतानाही आमच्या विरोधात उमेदवार का उभे करण्यात आले, भविष्यात महापालिकेत ‘राष्ट्रवादी’ची नेमकी भूमिका काय राहणार आहे, असा थेट सवाल काहींनी उपस्थित केल्याचे समजते.

    बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधताना खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, ‘महाविकास आघाडी म्हणून आम्ही पुणेकरांच्या प्रश्नांसाठी एकत्रितपणे लढणार आहोत. महापालिकेतील विरोधकाची भूमिका अधिक प्रभावी करण्याचा आमचा प्रयत्न असेल.’ काँग्रेसच्या नवनियुक्त शहराध्यक्ष दीप्ती चवधरी यांनीही महाविकास आघाडीतील ऐक्यावर भर दिला.

    काँग्रेसचे पुणे (पूर्व) शहराध्यक्ष प्रशांत जगताप या बैठकीला अनुपस्थित राहिल्याने राजकीय वर्तुळात विविध तर्कवितर्कांना उधाण आले होते. मात्र, जगताप यांनी याबाबत स्पष्टीकरण दिले. ते म्हणाले, ‘१२ ज्योतिर्लिंग आणि चारधाम यात्रेचे नियोजन तीन महिन्यांपूर्वीच केले होते. पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार सध्या धार्मिक यात्रेवर असल्याने बैठकीस उपस्थित राहता आले नाही.’

    दरम्यान, बैठकीतील चर्चेनंतर शहरातील विविध प्रलंबित प्रश्नांवर संयुक्तपणे संघर्ष करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार १२ जून रोजी महाविकास आघाडीचे प्रमुख नेते पुणे महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांची भेट घेणार आहेत. या बैठकीला खासदार सुप्रिया सुळे, काँग्रेसचे नेते आमदार सतेज पाटील, काँग्रेस व राष्ट्रवादीचे नगरसेवक आणि प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार असून, महापालिकेच्या कारभाराविरोधात संयुक्त भूमिका मांडण्यात येणार आहे.

    लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.

    पत्रकारितेतील अनुभव
    अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.

    मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU

    शैक्षणिक पात्रता
    अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed