नमित पाटील, पालघर: गोविंदा पथकातील जखमी सदस्याच्या उपचारावरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी खासगी रुग्णालयात घुसून धुडगूस घातला. तेथील डॉक्टर व कर्मचाऱ्यांना शिवीगाळ, रुग्णालयाची तोडफोड करण्याची धमकी आणि एका कर्मचाऱ्याच्या कानशिलात लगावल्याच्या आरोपांवरून शिवसेनेचे पालघर जिल्हाप्रमुख कुंदन संखे, आमदार राजेंद्र गावित यांचे पुत्र रोहित गावित, शहरप्रमुख राहुल घरत, नगरसेवक नीलम संखे यांच्यासह १७ जणांवर पालघर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पालघर शहरातील शिवसेना जिल्हाप्रमुख कार्यालय परिसरात दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. गोविंदा पथकातील सदस्य थर लावतानाकाही जण जखमी झाले. जखमी झाल्यानंतर पाच जणांना उपचारासाठी जवळील रिलीफ या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यापैकी एका रुग्णाच्या डोक्याला व मणक्याला दुखापत झाल्याने डॉक्टरांनी सीटी स्कॅनसह पुढील उपचार आवश्यक असल्याचे सांगितले. उपचाराचे शुल्क सुमारे १९ हजार ८६६ रुपये असल्याचे रुग्णालयाकडून सांगण्यात आले होते. त्यापैकी १० हजार रुपये आयोजकांकडून जमा करण्यात आले.
शिवसेना शिंदे गटाचे पालघर जिल्हाप्रमुख कुंदन संखे यांच्यासह पदाधिकारी आणि समर्थक रुग्णालयात दाखल झाले. यावेळी डॉक्टरांनी सिटीस्कॅन का करण्यास सांगितला याबाबत विचारणा करत जाब विचारला. डोक्याला मार लागल्याने वैद्यकीय तपासणी कारणास्तव ते आवश्यक असल्याचे त्या ठिकाणी उपस्थित रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी सांगितले. मात्र यावेळी वाद निर्माण झाला आणि शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी अरेरावी करत दमदाटी केली आणि शिवीगाळ केल्याचा आरोप आहे. याचदरम्यान शहर प्रमुख राहुल घरात यांनी एका कर्मचाऱ्याला कानशिलात लगावल्याचा प्रकार घडला. त्यानंतर शिवीगाळ दमदाटी करत, रुग्णालयाची तोडफोड करण्याची धमकी दिल्याचे रुग्णालय प्रशासनाने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.
दरम्यान, रुग्णालयात घडलेल्या या संपूर्ण प्रकरणाचे सीसीटीव्ही फुटेज देखील पोलीस प्रशासनाकडे देण्यात आले आहे. याप्रकरणी १७ जणांविरोधात पालघर पोलीस ठाण्यात विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.
पत्रकारितेतील अनुभव
अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.
मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU
शैक्षणिक पात्रता
अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा