• Sat. Jun 6th, 2026
    राज्यातील महत्त्वाच्या घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स पाहा फक्त एका क्लिकवर


    Marathi News Live: पुणे स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीच्या उमेदवारीवरून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या नाराजीच्या नाट्यावर अखेर मंगळवारी पडदा पडला. शहराध्यक्ष, माजी आमदार सुनील टिंगरे यांनी पक्षाचे नेते, खासदार पार्थ पवार यांची भेट घेतल्यानंतर आपण पक्षाच्या निर्णयाबाबत नाराज नसल्याचे स्पष्ट केले. महायुतीचे अधिकृत उमेदवार विक्रम काकडे यांच्या प्रचारात सक्रिय सहभागी होणार असल्याचे जाहीर करून त्यांनी बंडखोरीच्या चर्चांना पूर्णविराम दिला. फुगेवाडी विषारी दारूकांड प्रकरणात मंगळवारी (२ जून) आणखी एकाचा मृत्यू झाला. त्यामुळे या प्रकरणातील मृतांचा आकडा २५ वर पोहोचला आहे. यात फुगेवाडीतील १७, तर पुण्यातील आठ नागरिकांचा समावेश आहे. प्रफुल्ल अरिकस्वामी (वय २७) असे मृत्यू झालेल्या रुग्णाचे नाव आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed