Pune Crime : घटनेच्या दिवशी खेळत असलेल्या तिघा मुलांना आरोपीने हटकले होते. त्यानंतर आरोपी पीडित मुलीला गोठ्याशेजारच्या पत्र्याच्या शेडमध्ये घेऊन जाताना त्या मुलांनी पाहिले होते. यावेळी त्यांनी फटीतून पाहिले असता आरोपी पीडित मुलीसमवेत दिसला होता.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
म. टा. प्रतिनिधी, पुणे : नसरापूर येथे चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करून तिचा खून केल्याप्रकरणी आरोपीविरोधात तीन प्रत्यक्षदर्शी मुलांची साक्ष मंगळवारी विशेष न्यायालयात नोंदविण्यात आली. आरोपीला पीडितेसमवेत पत्र्याच्या शेडमध्ये पाहिल्याचे तिन्ही मुलांनी न्यायालयासमोर सांगितले. येरवडा कारागृहात झालेल्या ओळख परेडमध्ये आणि न्यायालयात व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर असलेल्या आरोपीलाही मुलांनी ओळखले.
१५ जणांची साक्ष
भोर तालुक्यातील नसरापूर येथे एक मे रोजी साडेतीन वर्षांच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करून तिचा खून केल्याप्रकरणी आरोपी भीमराव प्रभाकर कांबळे (वय ६५, रा. भोर) याच्याविरोधात राजगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. विशेष न्यायाधीश एस. आर. साळुंखे यांच्या न्यायालयात या संवेदनशील खटल्याची सुनावणी सुरू आहे. यात आतापर्यंत एकूण १५ साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात आली.
त्यामध्ये आरोपीला पीडितेसमवेत गुन्ह्याच्या घटनास्थळी पाहणाऱ्या तीन मुलांची साक्ष विशेष सरकारी वकील अजय मिसर यांनी नोंदविली. पीडित कुटुंबाचे वकील अॅड. मनीष पाडेकर आणि आरोपीचे वकील अॅड. हिंमतराव सुर्यवंशी उपस्थित होते. Georgia Crash : लग्नानंतर नवदाम्पत्य निघालं, पायलटचा अट्टाहास जीवावार, हेलिकॉप्टर कोसळून नवरदेवाचा अंत, वधूच्या समोरच प्राण सोडले
फटीतून मुलांना आरोपी दिसलेला
या तिन्ही प्रत्यक्षदर्शी मुलांची साक्ष न्यायालयात महत्त्वाची ठरली. घटनेच्या दिवशी खेळत असलेल्या या मुलांना आरोपीने हटकले होते. त्यानंतर आरोपी पीडितेला गोठ्याशेजारच्या पत्र्याच्या शेडमध्ये घेऊन जाताना मुलांनी पाहिले. त्यामुळे त्यांनी फटीतून पाहिले असता आरोपी पीडित मुलीसमवेत दिसला.
सत्तार, दानवेंनंतर संजय राऊतांची मोठी प्रतिक्रिया; शिंदे गटाला मातोश्रीवर येण्याची खुली ऑफर
आरोपीने दगड मारले, मुलं पळून गेली
आरोपीने या मुलांना पाहून त्यांना दगड मारले. त्यामुळे मुले तेथून निघून गेली होती. हा सर्व घटनाक्रम मुलांनी न्यायालयात सांगितला. या प्रकरणात त्यांनी आधी न्यायालयासमोर जबाब नोंदविला होता, तसेच ओळख परेडमध्ये आरोपीला ओळखले होते. बचाव पक्षातर्फे साक्षीदारांची उलटतपासणीची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. या खटल्यात एकूण ८२ साक्षीदारांची यादी सरकार पक्षातर्फे न्यायालयात देण्यात आली आहे. Saket Building Collapse : बाबा, परीक्षेनंतर या; शेवटचं वचन अधुरं राहिलं, बर्थडेच्या तोंडावर लेकीचा अलविदा, ढिगाऱ्याजवळ पिता निर्विकार चेहऱ्याने बसून याआधी, चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करून तिचा खून केल्याप्रकरणी आरोपी भीमराव कांबळे याच्याविरोधात पुण्याच्या विशेष न्यायालयात गुरुवारी आरोप निश्चित करण्यात आले होते. कांबळे याला गुरुवारी सकाळी विशेष न्यायाधीश एस. आर. साळुंखे यांच्या न्यायालयात अकराच्या सुमारास कडेकोट बंदोबस्तात हजर करण्यात आले. या प्रकरणात दाखल आरोपपत्र आणि आरोपीविरोधातील पुरावे आरोप निश्चित करण्यासाठी भक्कम असल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले असून, या खटल्याची शुक्रवारपासून दररोज ‘इन-कॅमेरा’ सुनावणी घेण्याचे आदेश दिले. दरम्यान, आरोपी मानसिकदृष्ट्या सुदृढ असल्याचा वैद्यकीय अहवाल सरकार पक्षातर्फे न्यायालयात सादर करण्यात आला.
लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.
पत्रकारितेतील अनुभव अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.
पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.
अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.
शैक्षणिक पात्रता अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.… आणखी वाचा