Maharashtra Vidhan Parishad Election : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे कार्यकर्ते आणि मतदानाचा अधिकार असलेल्या नगरसेवकांच्या मते, किमान उमेदवारी अर्ज माघारीच्या दिवसापर्यंत निवडणुकीची उत्सुकता कायम ठेवायला हवी होती.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
म. टा. विशेष प्रतिनिधी, नाशिक : नाशिक विधान परिषद निवडणुकीतून शिवसेना ‘उबाठा’ने माघार घेतल्यानंतर पदाधिकारी आणि नगरसेवकांमध्ये असंतोषाची ठिणगी पडली आहे. ५२ मतदार असतानाही निवडणूक न लढवणे आश्चर्यकारक असून, लढून पराभव स्वीकारणे योग्य होते, असा सूर शिवसेना ‘उबाठा’ गटातील पदाधिकारी व नगरसेवकांमध्ये आहे. पक्षात निर्माण झालेला असंतोष शमविण्यासाठी शिवसेना नेते खासदार संजय राऊत बुधवारी (दि. ३) नाशिकमध्ये येऊन पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत.
शिवसेना ‘उबाठा’तर्फे माजी आमदार वसंत गिते, अनिल कदम यांनी उमेदवारी अर्ज घेतल्यामुळे या दोघांपैकी एक निवडणूक रिंगणात उतरेल अशी चर्चा होती. परंतु, अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी (दि. २) निवडणूकच न लढवण्याचा निर्णय जाहीर करत ठाकरे गटाच्या नेत्यांनी सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. या भूमिकेमुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिवसेना यांच्या नेतृत्वातील शिवसेनेला ‘बाय’ मिळाल्याची चर्चा सुरू झाली आहे.
घोडेबाजाराच्या कारणास्तव माघार
विधान परिषद निवडणुकीत सुरु असलेला घोडेबाजार मान्य नसल्याचा दावा करत, आपल्याला या पापात वाटेकरी व्हायचे नाही, म्हणून ‘उबाठा’ने निवडणुकीत उमेदवार दिला नसल्याचे स्पष्टीकरण नाशिक जिल्हा संपर्कप्रमुख रवींद्र मिर्लेकर यांनी दिले होते. माजी आमदार अनिल कदम निवडणूक लढण्यासाठी इच्छुक असताना ऐनवेळी गटनेते केशव पोरजे यांना निवडणूक लढवण्याचा सल्ला संपर्कप्रमुखांनी दिल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे नाराज झालेले कदम बैठकीला न थांबल्याची चर्चा शिवसैनिकांमध्ये आहे. Harbour Local : CSMT वरुन थेट गाठा बोरिवली, हार्बर मार्गाच्या विस्ताराला वेग, गोरेगावच्या पुढील प्रवाशांना मोठा दिलासा
माघारीपर्यंत उत्सुकता ताणायला हवी होती
पक्षाची ताकद दाखवण्यासाठी निवडणूक लढवायला हवी, अशी काही पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची इच्छा होती. पक्ष कार्यकर्ते आणि मतदानाचा अधिकार असलेल्या नगरसेवकांच्या मते, किमान उमेदवारी अर्ज माघारीच्या दिवसापर्यंत निवडणुकीची उत्सुकता कायम ठेवायला हवी होती.
सत्तार, दानवेंनंतर संजय राऊतांची मोठी प्रतिक्रिया; शिंदे गटाला मातोश्रीवर येण्याची खुली ऑफर
काँग्रेस, ‘राशप’तही नाराजी
‘मविआ’च्या जागावाटपात नाशिकची जागा शिवसेना ‘उबाठा’कडे आली होती. परंतु, ‘उबाठा’कडून अर्ज दाखल न झाल्याने घटकपक्ष राष्ट्रवादी ‘शप’ व काँग्रेसमध्येही नाराजी निर्माण झाली. हा असंतोष शमविण्यासाठी अपक्षांना अप्रत्यक्ष मदत करण्याचा डाव आखला जात असल्याची चर्चा आहे. Trinamool Congress : तोच महिना तीच स्थिती; जे चार वर्षांपूर्वी उद्धव ठाकरेंसोबत झालं, तेच ममता बॅनर्जींसोबत होणार? दोन तृतीयांश TMC आमदार बंडाच्या पवित्र्यात
लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.
पत्रकारितेतील अनुभव अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.
पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.
अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.
शैक्षणिक पात्रता अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.… आणखी वाचा