• Thu. Jun 18th, 2026

    Pune Crime: पुण्यात विषारी दारूने लोकांचा जीव घेतला, आता पोलिसांकडून आकडा लपवण्याचा प्रयत्न? धक्कादायक माहिती उघड

    Pune Crime: पुण्यात विषारी दारूने लोकांचा जीव घेतला, आता पोलिसांकडून आकडा लपवण्याचा प्रयत्न? धक्कादायक माहिती उघड

    म. टा. प्रतिनिधी, हडपसर : पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये विषारी दारू प्यायल्यामुळे झालेल्या मृत्यूंच्या प्रकरणात आता मृतांच्या आकडेवारीवरूनच गंभीर प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. दोन्ही शहरांमध्ये मिळून २३ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत असताना राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने (सीआयडी) प्रसिद्ध केलेल्या निवेदनात केवळ १५ जणांच्या मृत्यूंचा उल्लेख करण्यात आल्याने मृतांचा आकडा कमी दाखवण्याचा प्रयत्न सुरू आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

    या प्रकरणी दापोडी आणि हडपसर पोलिस ठाण्यांत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याचा तपास पोलिस महासंचालकांच्या आदेशानुसार २९ मे रोजी राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे वर्ग करण्यात आला आहे. सीआयडीने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार, दापोडी परिसरात आतापर्यंत ११ जणांचा मृत्यू झाला असून, हडपसर परिसरात चार जणांचा मृत्यू झाला आहे. म्हणजेच दोन्ही भागांतील मृतांचा एकूण आकडा १५ होतो. दापोडी पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यात सहा आरोपींना अटक करण्यात आल्याचेही नमूद करण्यात आले आहे. मात्र, स्थानिक पातळीवर उपलब्ध माहितीनुसार आणि दोन्ही शहरांतील विविध रुग्णालयांमध्ये उपचारादरम्यान झालेल्या मृत्यूंच्या आकडेवारीनुसार पिंपरी-चिंचवड शहरात १५ आणि पुण्यात सात जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यानुसार मृतांचा एकूण आकडा २२वर पोहोचत असल्याचे दिसून येते; तसेच रविवारी सायंकाळी ससून रुग्णालयात आणखी एकाचा मृत्यू झाला.

    यामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. प्रत्यक्षात मृतांची संख्या २३ असेल, तर सीआयडीच्या निवेदनात केवळ १५ मृत्यूंचाच उल्लेख का करण्यात आला? काही मृत्यूंची नोंद अद्याप संबंधित गुन्ह्यांमध्ये करण्यात आलेली नाही का? उपचारादरम्यान मृत्यू झालेल्या काही रुग्णांचा समावेश आकडेवारीत करण्यात आलेला नाही का?, की अधिकृत नोंदींमध्ये मृतांचा आकडा कमी ठेवला जात आहे? अशा प्रश्नांची चर्चा सुरू झाली आहे.

    दरम्यान, पांढरेमळा परिसरात विषारी दारू प्यायल्यानंतर चौथ्या दिवशी प्रकृती बिघडलेल्या कामगाराचा उपचारादरम्यान रविवारी मृत्यू झाला. सचिन सोनवणे (वय ४२, रा. तुकाई टेकडी, हडपसर )असे मृत्यू झालेल्या कामगाराचे नाव आहे. हडपसरचे नगरसेवक मारुती तुपे यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनवणे यांनी २७ मे रोजी पांढरे मळा परिसरातील हातभट्टी येथे दारूचे सेवन केले होते. त्यानंतर त्यांना किरकोळ त्रास जाणवत होता. मात्र, रविवारी पहाटे त्यांची प्रकृती अचानक खालावल्याने रुग्णवाहिकेतून ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे उपचार सुरू असतानाच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

    लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.

    पत्रकारितेतील अनुभव
    अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.

    मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU

    शैक्षणिक पात्रता
    अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed