• Fri. Jun 5th, 2026

    राष्ट्रवादीत हाय-व्होल्टेज ड्रामा! विक्रम काकडेंना उमेदवारी, सुनील टिंगरेंना ‘कात्रजचा घाट’; अनेक नेते नाराज

    राष्ट्रवादीत हाय-व्होल्टेज ड्रामा! विक्रम काकडेंना उमेदवारी, सुनील टिंगरेंना ‘कात्रजचा घाट’; अनेक नेते नाराज

    म. टा. प्रतिनिधी, पुणे: पुणे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधान परिषदेच्या निवडणुकीत ‘महायुती’चा घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारीवरून सोमवारी दिवसभर प्रचंड राजकीय गोंधळ आणि नाराजीनाट्य पाहायला मिळाले. माजी खासदार संजय काकडे यांचे चिरंजीव विक्रम काकडे यांची उमेदवारी निश्चित झाल्यानंतर ‘राष्ट्रवादी’च्या जुन्या निष्ठावंतांमध्ये तीव्र असंतोष पसरला.

    शहराध्यक्ष व माजी आमदार सुनील टिंगरे यांना ‘एबी फॉर्म’ दिल्याची चर्चा असताना, प्रत्यक्षात त्यांचा केवळ ‘पर्यायी’ (सबस्टिट्यूट) उमेदवार म्हणून अर्ज भरून घेऊन त्यांना राजकीयदृष्ट्या कात्रजचा घाट दाखविण्यात आल्याचे उघड झाले आहे.

    Pune News : पुणे विषारी दारू प्रकरणातील आरोपींना पाहून नातेवाईकांचा संताप, मारण्यासाठी धावले, फुगेवाडीत काय घडलं?
    खासदार पार्थ पवार यांचे निकटवर्तीय असलेले विक्रम काकडे यांना विधान परिषदेची उमेदवारी देण्याचा निर्णय रविवारी मध्यरात्रीच झाला होता. हा सुगावा लागताच सोमवारी सकाळी आमदार सुनील शेळके, शंकर मांडेकर, चेतन तुपे, विलास लांडे आणि माजी आमदार सुनील टिंगरे यांनी थेट पवार यांच्या भोसलेनगर येथील निवासस्थानी धाव घेतली.

    उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, पार्थ पवार, जय पवार यांच्या समवेत झालेल्या या बैठकीत, विक्रम काकडे हे अधिकृतरीत्या पक्षात नसताना त्यांना उमेदवारी देणे योग्य नाही; पक्षातील जुन्या व्यक्तीलाच संधी द्या, असा सूर इच्छुकांनी लावला. अखेरीस चर्चा शांत करण्यासाठी टिंगरे यांनाही ‘एबी फॉर्म’ देऊन अर्ज भरण्यास सांगण्यात आले.

    Maharashtra TimesPune Crime: पुण्यात विषारी दारूने लोकांचा जीव घेतला, आता पोलिसांकडून आकडा लपवण्याचा प्रयत्न? धक्कादायक माहिती उघड
    ‘महायुती’चे नेते उपस्थित
    विक्रम काकडे यांचाच अर्ज अधिकृत असल्याचे लक्षात येताच महायुतीच्या नेत्यांनी त्यांचा अर्ज भरताना आपली उपस्थिती लावली. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, शिवसेना नेत्या, आमदार डॉ. नीलम गोऱ्हे, महापौर मंजूषा नागपुरे, जय पवार आदी या वेळी उपस्थित होते.

    टिंगरेंवर ‘गेम’, कार्यकर्त्यांची घोषणाबाजी
    जिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज भरण्यास पोहोचेपर्यंत सुनील टिंगरे यांचा स्वतंत्र उमेदवारी अर्ज दाखल होणार असल्याचे ठरले होते. त्यामुळे टिंगरे यांच्या समर्थकांनीही मोठ्या प्रमाणात जिल्हाधिकारी कार्यालयात गर्दी केली होती. विक्रम काकडे यांच्या अर्जामध्ये टिंगरे यांचा उल्लेख पर्यायी (सबस्टिट्यूट) उमेदवार असा करण्यात आला; तसेच टिंगरे यांना स्वतंत्र ‘एबी फॉर्म’ न देता त्यांचा नुसताच अर्ज दाखल करण्यात आला. काकडे यांचा अर्ज त्रुटी असल्यामुळे बाद झाला तरच टिंगरे यांचा अर्ज वैध होऊ शकतो. काकडे यांचा अर्ज वैध ठरला, तर टिंगरे यांचा अर्ज बाद होणार आहे. त्यामुळे टिंगरे यांना ‘कात्रजचा घाट’ दाखविण्यात आल्याचे कार्यकर्त्यांच्या लक्षात येताच त्यांच्याकडून घोषणाबाजी करण्यास सुरुवात झाली. टिंगरे यांनी कार्यकर्त्यांना आवर घालत वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला.

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

    किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

    पत्रकारितेतील अनुभव
    किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

    शैक्षणिक पात्रता
    किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed