मुंबई, दि. ७ : आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त मंत्रालयात त्यांच्या प्रतिमेस सामान्य प्रशासन विभागाचे सहसचिव संतोष गावडे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

कक्ष अधिकारी दत्तात्रय शिंदे, निलेश हरड, सहायक कक्ष अधिकारी विजय शिंदे यांनीही आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली. यावेळी मंत्रालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
०००
प्रविण भुरके/स.सं.