• Sun. Jun 14th, 2026

    Pune News : विषारी दारुकांड प्रकरण; अनेकांच्या संसाराची राखरांगोळी, कुणाच्या भावाचा तर कुणाच्या लेकाचा अंत, पोलिसांच्या धडक कारवाया

    Pune News : विषारी दारुकांड प्रकरण; अनेकांच्या संसाराची राखरांगोळी, कुणाच्या भावाचा तर कुणाच्या लेकाचा अंत, पोलिसांच्या धडक कारवाया

    Pune Poisonous Liquor Case : पुणे ग्रामीण पोलिसांनी अवैध दारूधंद्यांविरोधात धडक मोहीम सुरू केली असून, शिरूर तालुक्यात रांजणगाव एमआयडीसी आणि शिक्रापूर पोलिसांनी संयुक्तपणे कारवाया केली आहे. निमगाव भोगी, शिक्रापूर आणि सणसवाडी परिसरातील हातभट्टी अड्डे उद्ध्वस्त करून पोलिसांनी अडीच लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त केला. यात एकाला अटक केली असून, १३ जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. यासह पिसोळी येथील दगडे वस्ती येथे हातभट्टी दारूची विक्री सुरू असल्याची माहिती येवलेवाही पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार छापा टाकून पोलिसांनी सुनील राजा सिंग (वय २५, रा. पिसोळी) आणि दिनेश मखनावत यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

    पिंपरी चिंचवड विषारी दारु प्रकरण(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    म. टा. प्रतिनिधी, पुणे : गावठी दारूमुळे बळी गेल्यानंतर उत्पादन शुल्क विभाग अॅक्शन मोडवर आला आहे. दोन दिवसांमध्ये दहा ठिकाणचे दारूअड्डे नष्ट करण्याची कामगिरी करण्यात आली आहे. शनिवारी अड्डे नष्ट करण्याबरोबर संबंधितांविरोधात ३३ गुन्हे दाखल करण्यात आले असून, त्यातील २५ आरोपींना अटक करण्यात आली आहे. एक हजार ७२७ लिटर गावठी दारूसह १७ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

    शुल्क विभागावर टीकेची झोड

    विषारी दारूमुळे १९ जणांचा बळी गेल्यानंतर पोलिसांपाठोपाठ उत्पादन शुल्क विभागावर टीकेची झोड उठली आहे. या कारणास्तव उत्पादन शुल्क विभागाने जिल्ह्यात २१ पथकांची नियुक्ती करून छापेमारी करण्यास सुरुवात केली आहे. अवैधरीत्या गावठी दारू तयार करणारी ठिकाणे नष्ट करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. पुणे शहरासह जिल्ह्यातील दहा ठिकाणी शनिवारी छापे टाकून उत्पादन शुल्क विभागाने गावठी दारूचे अड्डे नेस्तनाबूत केले.
    Maharashtra TimesPune Crime: पुण्यात विषारी दारूने लोकांचा जीव घेतला, आता पोलिसांकडून आकडा लपवण्याचा प्रयत्न? धक्कादायक माहिती उघड
    पुणे शहरातील कोथरूड, आंबेगाव पठार, काळेपडळ, भूगाव, आळंदी, शिंदवणे, ससेवाडी, तळेगाव, नगरगाव (शिरूर) या ठिकाणचे अड्डे नष्ट केले आहेत. या कारवायांमध्ये एक हजार ७२७ लिटर गावठी तयार दारू, १६ हजार ३०० लिटर रसायने जप्त करून १७ लाख ४६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. संबंधितांवर ३३ गुन्हे दाखल करून २५ जणांना अटक केल्याचे उत्पादन शुल्कच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. पुणे शहराजवळील लोणी काळभोर, सोरतापवाडी, शिंदवणे, तळेगावजवळ आंबी, शिरगाव; तसेच शिरूर तालुक्यातील आपटी, लोणावळ्याजवळील वाड्यावस्त्या; तसेच आळंदीजवळील खेड येथील अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले.

    ‘मिथेनॉल’वापर प्रथमच

    गावठी हातभट्टी दारूनिर्मितीसाठी रसायने वापरतात. ही दारू म्हणजे इथेनॉलचाच एक प्रकार मानला जातो. मात्र, हडपसर, पिंपरीत मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींनी प्यायलेल्या दारूत मिथेनॉलचा वापर केल्याचे प्रथमच उघडकीस आले आहे, याकडे उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी लक्ष वेधले.
    Maharashtra TimesST Bus: एसटीची स्वच्छतागृहे आता मोफत; ७८व्या वर्धापनदिनानिमित्त महामंडळाचा निर्णय; प्रवास स्वच्छ व सुखद होणार

    पिंपरीत ११ कारवाया

    अवैध दारूविक्री आणि निर्मिती प्रकरणी पिंपरी-चिंचवड पोलिसांनी शहराच्या वेगवेगळ्या भागात ११ कारवाया करून सुमारे दोन लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. या कारवायांमध्ये एका अल्पवयीन मुलासहा १३ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. गुन्हे शाखा युनिट-चारच्या पथकाने एमबी कॅम्प देहूरोड येथे कारवाई करून राजेश श्रीरंग कदम (वय ५३, देहुरोड) याच्‍यावर गुन्‍हा दाखल केला.

    मावळ तालुक्यातील पुसणे येथे ओढ्याकाठी कारवाई करून महिलेवर गुन्हा दाखल केला. मालमत्ता गुन्हेविरोधी पथकाने हिंजवडी येथे कारवाई करून धनराज सोमाजी नट (रा. हिंजवडी) याच्यावर गुन्हा दाखल केला. खंडणी विरोधी पथकाने दारूची वाहतूक करणारी एक रिक्षा पकडून गामरबहादूर ढकळ (वय ४६) आणि संतोष रनवरे (वय ३०) यांच्यावर गुन्‍हा दाखल केला. बावधन पोलिसांनी ३६ वर्षीय महिलेकडून १७ हजार ८०० रुपयांचा दारूसाठा जप्त केला.
    Maharashtra TimesMumbai News: वांद्रेतील गरीबनगर परिसरात रिक्षाचालकांचा कब्जा, अतिक्रमण हटवल्यावरही कोंडी कायम; प्रवाशांची दररोज गैरसोय

    दोन वेगवेगळ्या खोल्यांवर छापे

    चिंचवड पोलिसांनी नंद डेअरीच्या पाठीमागे कारवाई करून महिलेला ताब्यात घेतले. दक्षिण म्हाळुंगे पोलिसांनी निघोजे येथील एका विधीसंघर्षित बालकाला ताब्यात घेतले. सिग्मा चौकातील कारवाईदरम्यान आरोपी दुरेश रमेश राठोड (वय ३३) पळून गेला. पिंपरीतील भाटनगर येथे पोलिसांनी दोन वेगवेगळ्या खोल्यांवर छापे टाकून दोन महिलांच्या घरांतून दारूसाठीचे साहित्य जप्त केले. चऱ्होली खुर्द येथे कारवाई करून एका महिलेवर आळंदी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. दक्षिण महाळुंगे पोलिसांनी दारूविक्री करणाऱ्या सुरेश रमेश राठोड (वय ३३) याच्यावर गुन्हा दाखल केला.

    प्रशांत पाटील

    लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.

    प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.

    ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.… आणखी वाचा