• Fri. Jun 5th, 2026
    रेल्वे मार्गांखालून भुयारी मार्ग, देशातील पहिला ‘जलरोधक सबवे’ भिवंडीत; अपघातांची संख्या कमी होणार

    Mumbai Local Accident: मुंबई लोकलच्या स्थानकांवर पादचारी पूल उभारले असले तरी त्यांची उंची अधिक असल्यामुळे नागरिक पुलांऐवजी रुळ ओलांडण्याचा पर्याय निवडतात. त्यामुळे होणार अपघात कमी करण्यासाठी आता मार्गिकांच्या खालून भुयारी मार्ग बांधण्यात येईल.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    म.ट. खास प्रतिनिधी, मुंबई: मुंबई उपनगरी रेल्वे रुळांवरील मृत्यू रोखण्यासाठी पादचारी पुलांच्या पर्यायाला मर्यादा आल्यानंतर आता मुंबई रेल्वे विकास महामंडळाने (एमआरव्हीसी) सबवेवर लक्ष केंद्रित केले आहे. भारतीय रेल्वेच्या इतिहासात पहिल्यांदाच पूर्णपणे जलरोधक सबवे भिवंडीत उभारण्यात येत आहे. त्याची बांधणी करताना त्रिस्तरीय जलरोधक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. हा प्रयोग यशस्वी ठरल्यास मुंबईत रुळांवरील जास्त अपघात होणाऱ्या ठिकाणी अशा भुयारी मार्गाची उभारणी करण्यात येणार आहे.

    नागरिकांकडून पादचारी पुलांकडे दुर्लक्ष

    रेल्वे रुळांवरील मृत्यू रोखण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकारकडून ‘एमआरव्हीसी’ला अर्थपुरवठा केला जातो. महामुंबईत रेल्वे रूळ ओलांडताना सर्वाधिक अपघात होणाऱ्या ३६ ठिकाणी महामंडळाकडून पादचारी पुलाची उभारणी करण्यात आली आहे. मात्र, उंची अधिक असल्याने प्रवासी पुलाऐवजी जीव धोक्यात घालत रूळ ओलांडण्यास प्राधान्य देतात.

    महामुंबईतील पनवेल-वसई मार्गावरील भिवंडी स्थानकात ‘ऑल वेदर सबवे’ उभारण्यात येत आहे. ‘डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर’च्या (डीएफसी) दोन मार्ग, दोन मेल-एक्स्प्रेस आणि तीन लूप मार्गिका अशा सात मार्गिकांच्या खालून हा पूर्व-पश्चिम जोडणारा भुयारी मार्ग जाणार आहे. पादचारी पुलाची उंची साधारण ११ ते १२ मीटर उंच असते. भुयारी मार्ग जमिनीपासून चार ते पाच मीटर खाली बांधणे सहज शक्य आहे.

    Maharashtra TimesBhiwandi ST Depot: पाच दशकांहून जुन्या भिवंडी एसटी स्थानकाची अखेर पुनर्बांधणी; इमारत, फलाटांचा विकास, हजारो प्रवाशांना फायदा

    कसा बांधणार मार्ग?

    भिवंडीचा सबवे ६८ मीटर लांब आहे. त्याच्या बांधकामासाठी ‘बॉक्स पुशिंग’ तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. बॉक्सची जाडी ४०० मिमी आहे. रेल्वे वाहतूक सुरू असतानाही सुरक्षितता अबाधित राहावी यासाठी रुळांखाली मजबूत लोखंडी गर्डर बसवण्यात येत आहेत. ‘कप अँड कोन’ पद्धतीच्या बॉक्स प्रणालीद्वारे भूमिगत संरचना जोडली जाणार आहे. बॉक्सच्या सांध्यांमध्ये रबर गॅस्केट बसवून पाणी झिरपण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे.

    सन २०२२ ते २०२५दरम्यान मध्य रेल्वेवर एकूण सहा हजार २२५ आणि पश्चिम रेल्वेवर तीन हजार ६२७ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. ‘एमयूटीपी ३’ प्रकल्पसंचाअंतर्गत रूळ ओलांडणीच्या संवेदनशील ठिकाणी उपाययोजना पूर्ण झाल्या आहेत. नव्याने निर्माण झालेल्या संवेदनशील ठिकाणांचा एकत्रित समावेश ‘एमयूटीपी ४’मध्ये करण्यात येणार आहे.

    पाणी रोखण्यासाठी खबरदारी

    पावसाळ्यात शहरातील अनेक सबवेमध्ये पाणी साचणे, ओलावा येणे अशा अडचणी येतात. त्यामुळे प्रवासी सबवेचा वापर करत नाहीत. ‘एमआरव्हीसी’च्या भिवंडी सबवेमध्ये अशा समस्या टाळण्यासाठी बॉक्सच्या सांध्यांवर रबर गॅस्केट, विशेष जलरोधक मिश्रण आणि अतिरिक्त संरक्षणात्मक थर लावण्यात येणार आहे. पावसाचे पाणी आत येऊ नये म्हणून सबवेच्या प्रवेशद्वारावर आणि बाहेर पडण्याच्या मार्गाची पातळी ६० सेंटीमीटरने उंच ठेवण्यात येणार आहे.

    Maharashtra TimesDombivali Railway Station: डोंबिवलीकरांचा प्रवास सुखकर होणार! स्थानक परिसराच्या विकासासाठी हालचाली; गर्दी, कोंडीतून कायमची सुटका

    ‘एमआरव्हीसी कडून भिवंडीत येणाऱ्या ‘ऑल वेदर सबवे’चे काम शेवटच्या टप्प्यात आहे. मान्सून सुरू होण्यापूर्वी हा भुयारी मार्ग प्रवाशांसाठी खुला करण्यात येईल. भुयारी मार्गाचा प्रयोग यशस्वी ठरल्यास मुंबईतही याचा वापर करण्याचे नियोजन आहे. – विलास वाडेकर, अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक, एमआरव्हीसी सात रेल्वे मार्गांखालून उभारण्यात

    सानिया कदम

    लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.

    पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.

    यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.

    २०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.

    लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.… आणखी वाचा