Parbhani Politics: परभणीतील विधान परिषदेसाठी शिंदे गटाने मुस्लिम चेहऱ्याला उमेदवारी दिली आहे. त्यामुळे आता इथली लढत ही लक्षवेधी झाली आहे. याठिकाणी शिंदे गटाने सईद खान यांना उमेदवारी दिली आहे. तर ठाकरे गटाकडून डॉ. विवेक नावंदर मैदानात आहेत.
मतदारसंघातील पक्षाची माहिती
परभणी-हिंगोली विधान परिषदेची जागा ही पूर्वीपासूनच शिवसेनेकडे होती. यापूर्वी या विधान परिषदेच्या मतदारसंघातून विप्लव बाजोरिया यांनी प्रतिनिधित्व केले होते. त्यानंतर शिवसेनेमध्ये फूट पडली आणि आमदार विप्लव बाजोरिया यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे महायुतीचा परभणी हिंगोली विधानपरिषदेवर नैसर्गिकरित्या दावा प्रबळ होता, पण संख्याबळानुसार या जिल्ह्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडे सर्वात जास्त मतदान आहे. त्यापाठोपात भाजपकडे संख्याबळ आहे. त्यामुळे परभणी हिंगोली विधानपरिषदेची जागा ही कोणाला सुटणार? याविषयी मात्र प्रचंड सस्पेन्स होता. पण कालच परभणीची जागा ही शिवसेना शिंदे गटाला सुटली असल्याचे जाहीर करण्यात आले. पण उमेदवार मात्र शिवसेना शिंदे गटाकडून जाहीर करण्यात आला नव्हता.
कोण कोण होते इच्छुक?
परभणी हिंगोली मतदार संघातून शिवसेना शिंदे गटाकडून माजी आमदार विप्लव बाजोरिया, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सईद खान, जिल्हाप्रमुख आनंद भरोसे, हिंगोलीचे जिल्हाप्रमुख कदम, तसेच माजी मंत्री अर्जुन खोतकर यांचे सुपुत्र हे सर्वजण इच्छुक होते. त्यामुळे उमेदवारी कोणाला द्यावी असा प्रश्न उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर पडला होता. एकाची उमेदवारी जाहीर केली तर पुन्हा बंडखोरी होईल अशी भीतीदेखील होती. त्यामुळे आज उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी शिवसेना शिंदे गटाकडून परभणी हिंगोली विधान परिषद मतदारसंघासाठी उमेदवारीची घोषणा करण्यात केली आहे.
Goregaon Mulund Link Road: गोरेगाव-मुलुंड लिंक रोडचा मार्ग मोकळा! BMCची कडक बंदोबस्तात मोठी पाडकाम मोहीम, 150 बांधकामं हटवली, पुढचा टप्पा कधी?
पक्ष मुस्लिमविरोधी नसल्याचा संदेश
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक मुस्लिम तरुण चेहरा रणांगणात उतरवून शिवसेना ही मुस्लिमविरोधी नसल्याचा स्पष्ट संदेश दिला आहे. भाजपसोबत असून आम्ही हिंदुत्व जरी प्रखरतेने मांडत असलो तरी मुस्लिमविरोधी नसल्याचे यामधून मात्र स्पष्ट होत आहे. सईद खान हे शिवसेना शिंदेगटाचे अल्पसंख्यांक विभागाचे प्रदेशाध्यक्ष आहेत. त्याचबरोबर परभणीच्या जिल्हाप्रमुखपदाची देखील जबाबदारी त्यांच्यावर आहे. मागे झालेल्या नगरपालिका निवडणुकीत पाथरी नगरपालिका आपल्या ताब्यात घेण्यात त्यांना यश मिळाले आहे.
Vidhan Parishad Election: भाजप-शिवसेना विश्वासात घेत नाही, राष्ट्रवादीच्या शिलेदाराने थेट बंड पुकारलं; अर्ज दाखल केला, पण शेवटच्या क्षणी काय घडलं?
कोण आहेत सईद खान?
- मागच्या १५ वर्षांपासून एकनाथ शिंदे यांचे कट्टर समर्थक
- ९ जुलै २०२३ पासून शिवसेना अल्पसंख्यांक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष
- मुंबईसह राज्यभर विविध सामाजिक,राजकीय व अल्पसंख्याक समाजाच्या उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग
- राज्यातील विविध नगरपालिका, महानगरपालिका आणि जिल्हा परिषदांमधील सुमारे 900 अल्पसंख्याक लोकप्रतिनिधींना शिवसेनेत प्रवेश दिला
- 2024 विधानसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवून 55000 मते प्राप्त केली.
- एकनाथ शिंदे, श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून राज्य व केंद्र शासनाच्या विविध योजनांमधून अल्पसंख्याक समाजासाठी सुमारे 5,600 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले. यामध्ये शिष्यवृत्ती, अल्पसंख्याक विकास महामंडळाचा निधी आणि इतर विविध योजनांचा समावेश आहे
- केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून पाथरी विधानसभा मतदारसंघात सुमारे 950 कोटी रुपयांचा निधी आणून विकासकामे केल
- 2025 नगरपरिषद निवडणुकांमध्ये पाथरी नगरपरिषदेवर शिवसेनेची सत्ता मिळवली पाथरी नगराध्यक्ष,व ९ नगरसेवक सोनपेठ आघाडी करून नगरपरिषदेचे नगराध्यक्ष तसेच १० व, मानवतमधील 5 नगरसेवक निवडून आणले
- 2026 जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये पाथरी विधानसभा मतदारसंघातून 2 जिल्हा परिषद सदस्य व 4 पंचायत समिती सदस्य निवडून आणण्यासाठी योगदान दिले
- पाथरी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 9 संचालक निवडून आणले
