मोबीन खान, संगमनेर (अहिल्यानगर): सध्या चमकोगिरी करणाऱ्यांची कमी नाही, सोशल मीडियावर प्रसिद्ध होण्यासाठी तरुण पिढी नवनवीन शक्कल लढवताना पाहायला मिळत आहे. एका तरुणाने अशीच एक वेगळी शक्कल लढवली आणि ती त्याला महागात पडली. स्वतःच्या वाढदिवसाचा रुबाब दाखवण्यासाठी सोशल मीडियावर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अधिकृत लेटरहेड आणि स्वाक्षऱ्यांचा वापर करून चक्क चॅट जीपीटी या कृत्रिम बुद्धिमत्ता ॲपच्या माध्यमातून बनावट शुभेच्छापत्र तयार करणाऱ्या तरुणाला घारगाव पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.याप्रप्रकरणी आरोपी विश्वजीत विजय धुळगंड (वय २४, रा. मांडवे बुद्रुक, ता. संगमनेर, जि. अहिल्यानगर) याच्याविरुद्ध फसवणूक आणि बनावटगिरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ३० मे २०२६ रोजी आरोपी विश्वजीत धुळगंड याचा २४ वा वाढदिवस होता. वाढदिवसाचे औचित्य साधून त्याने आपल्या ‘ओपो’ कंपनीच्या मोबाईलमधील चॅट जीपिटी या ॲपचा वापर केला. या ॲपच्या माध्यमातून त्याने देशाचे पंतप्रधान, राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या कार्यालयाचे अधिकृत लेटरहेड, राष्ट्रीय चिन्ह अशोकस्तंभ आणि त्यांच्या हुबेहूब स्वाक्षऱ्या असलेले बनावट शुभेच्छापत्र तयार केले.
हा प्रकार नियंत्रण कक्ष, अहिल्यानगर यांच्या निदर्शनास आल्यानंतर, त्यांनी तातडीने घारगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक हेमंत थोरात यांना कायदेशीर कारवाईचे आदेश दिले. सपोनि थोरात यांनी गोपनीय अंमलदार प्रमोद अशोक गाडेकर आणि पोलीस कॉन्स्टेबल बोडखे यांना तपासाची चक्रे फिरवण्याचे आदेश दिले.पोलीस पथकाने तात्काळ कारवाई करत मांडवे बुद्रुक येथून विश्वजीत धुळगंड याला ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता, त्याने चॅट जीपीटीच्या साहाय्याने हे बनावट पत्र तयार करून इन्स्टाग्रामवर नागरिकांची दिशाभूल करण्यासाठी पोस्ट केल्याची कबुली दिली.
दरम्यान, पोलीस कॉन्स्टेबल प्रमोद गाडेकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी विश्वजीत धुळगंड याच्याविरुद्ध पुढील कायद्यांनुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे. भारतीय न्याय संहिता (BNS): कलम ३३६(२)(३), ३४०(२), आणि ३१९(२) (बनावट दस्तऐवज तयार करणे व फसवणूक करणे). चिन्हे व नावे (अनुचित वापर प्रतिबंध) अधिनियम, १९५०: कलम ३ व ५ (राष्ट्रीय चिन्हांचा अवैध वापर करणे).”सोशल मीडियाचा वापर करताना जबाबदारीने करावा. कोणत्याही राष्ट्रीय चिन्हांचा, व्हीआयपी लेटरहेडचा किंवा मान्यवरांच्या नावाचा/स्वाक्षरीचा गैरवापर करून बनावट कागदपत्रे तयार करणे हा गंभीर आणि अजामीनपात्र गुन्हा ठरू शकतो. अशा स्टंटबाजीपासून तरुणांनी दूर राहावे, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.
पत्रकारितेतील अनुभव अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.
मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU
शैक्षणिक पात्रता अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा