• Fri. Jun 5th, 2026

    Accident News: मुंबईहून मुलगी माहेरी आली, लाडक्या लेकीसाठी आईने आंबे घेतले; पण घरी पोहोचण्यापूर्वीच अनर्थ; भीषण अपघातात मृत्यू

    Accident News: मुंबईहून मुलगी माहेरी आली, लाडक्या लेकीसाठी आईने आंबे घेतले; पण घरी पोहोचण्यापूर्वीच अनर्थ; भीषण अपघातात मृत्यू

    Dapoli Accident: रिसॉर्टमध्ये स्वयंपाक मदतनीस म्हणून काम करून शिल्पा साळवी या आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत होत्या.

    अज्ञात वाहनाच्या धडकेत महिलेचा मृत्यू(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    प्रसाद रानडे, रत्नागिरी: कोकणात अलीकडे रस्ते अपघातांचे प्रमाण वाढलं आहे. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर दापोली येथील मायलेकींचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच आता दापोली-खेड या राज्य मार्गावर भीषण अपघातात 45 वर्षीय महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे. दापोली तालुक्यातील टाळसुर शाळेजवळ हा दुर्दैवी अपघात रविवारी सायंकाळी उशिराच्या सुमारास घडला. शिल्पा सुरेश साळवी असे या मृत महिलेचं नाव आहे.

    याबाबतची सविस्तर माहिती अशी की, दापोली येथील आर्यावर्त येथे शिल्पा साळवी या अनेक वर्ष स्वयंपाक मदतनीस म्हणून काम करत होत्या. हसत खेळत राहणाऱ्या शिल्पा या मनमिळावू स्वभावाच्या होत्या. रविवारी सायंकाळी आपल्या सहकार्यांसमवेत गप्पागोष्टी करून कामावरून घरी टाळसूर येथे जाण्यास घरी पायी निघाल्या होत्या. त्यांची विवाहित असलेली मुलगी ही सुट्टीसाठी मुंबईहून दाभोळ येथे आली आहे. शिल्पा साळवी यांनी घरी निघाल्यानंतर मुलीला कॉल केला आणि तिच्यासाठी आंबेही घेतले होते. मात्र घरी जाताना हा दुर्दैवी अपघात झाला आणि यातच त्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे शिल्पा यांनी आपल्या लाडक्या लेकीला केलेला कॉल हा अखेरचा ठरला आहे. शिल्पा साळवी यांच्या मृत्यूने टाळसुर गावात शोककळा पसरली आहे. आपल्या सहकारी असलेल्या शिल्पा साळवी यांच्याशी आम्ही काही वेळापूर्वी बोललो आणि आता त्या जगात नाहीत हे ऐकूनच त्यांच्या सहकाऱ्यांना मोठा धक्का बसला आहे. या कर्मचाऱ्यांनीही तातडीने उपजिल्हा रुग्णालयात धाव घेतली.

    अपघातस्थळी नेमकं काय घडलं?

    रविवारी सायंकाळच्या सुमारास नेहमीप्रमाणे शिल्पा साळवी या चालत घरी निघाल्या होत्या. मात्र याचवेळी पाठीमागून आलेल्या अज्ञात वाहनाने त्यांना धडक दिली आणि वाहनचालक घटनास्थळाहून पसार झाला. धडकेनंतर गंभीर जखमी अवस्थेत शिल्पा साळवी या काही वेळ रस्त्यातच पडून होत्या. हा सगळा प्रकार लक्षात येताच टाळसुरे येथील ग्रामस्थांनी धावपळ करून त्यांना तात्काळ दापोली उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली होती.

    दरम्यान, या अपघाताची नोंद करण्याची कार्यवाही दापोली पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत सुरू होती. शिल्पा साळवी यांच्या पश्चात सासरे, विवाहित कन्या असं कुटुंब आहे. दापोली पोलिसांनीही या सगळ्या घटनेची गंभीर दखल घेतली असून तपास सुरू केला आहे.

    अक्षय शितोळे

    लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.

    पत्रकारितेतील अनुभव
    अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.

    मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU

    शैक्षणिक पात्रता
    अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा