Thane Water Supply: ठाणे महानगरपालिकेने बुधवारी शहरातील काही भागांमध्ये पाणीपुरवठा बंद राहील अशी माहिती दिली आहे. त्यामुळे नागरिकांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन पालिकेने केले आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
म. टा. खास प्रतिनिधी, ठाणे: ठाणे महापालिकेच्या पाणीपुरवठा योजनेतील देखभाल-दुरुस्तीच्या कामांमुळे बुधवारी सकाळी ९ ते रात्री ९ वाजेपर्यंत १२ तास पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. या कालावधीमध्ये शहरातील काही भागांमध्ये पाणीपुरवठा बंद राहिल. शिवाय पुढील कालावधीमध्येही कमी दाबाने पाणीपुरवठा सुरू होण्याची शक्यता महापालिकेकडून व्यक्त करण्यात आली आहे.
ठाणे महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा योजनेतील पिसे उदंचन केंद्र तसेच टेमघर जलशुद्धीकरण केंद्रातील उच्चदाब सबस्टेशनमध्ये पावसाळ्यापूर्व आवश्यक देखभाल व दुरुस्तीची कामे हाती घेण्यात येणार आहेत. यामध्ये कंट्रोल पॅनलची दुरुस्ती, ट्रान्सफॉर्मर ऑईल फिल्ट्रेशन आणि अन्य तांत्रिक कामांचा समावेश असून, ही कामे बुधवार, ३ जून रोजी सकाळी ९ ते रात्री ९ वाजेपर्यंत करण्यात येणार आहेत. या कामांसाठी ठाणे महानगरपालिकेच्या स्वतःच्या प्राधिकरणाच्या पाणीपुरवठा योजनेचा तसेच महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एम. स्टेम) पाणीपुरवठ्याचा १२ तासांचा शटडाऊन घेण्यात येणार आहे.
Thane Ring Metro: ठाणेकरांसाठी रिंग मेट्रो ठरणार डोकेदुखी? तज्ज्ञांचा आक्षेप, नागरिक आक्रमक; मुख्यमंत्र्यांकडे धाव
कोणत्या भागांवर परिणाम?
त्यामुळे घोडबंदर रोड, लोकमान्यनगर, वर्तकनगर, साकेत, ऋतुपार्क, जेल, गांधीनगर, रुस्तमजी, सिद्धांचल, इंदिरानगर, रूपादेवी, श्रीनगर, समतानगर, सिद्धेश्वर, इटरनिटी जंक्शन, मुम्ब्रा तसेच कळव्याच्या काही भागांमध्ये सकाळी ९ ते रात्री ९ वाजेपर्यंत पाणीपुरवठा पूर्ण बंद राहणार आहे. या शटडाऊननंतर पाणीपुरवठा पूर्वपदावर येईपर्यंत पुढील एक, दोन दिवस काही भागांत कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी अत्यंत काटकसरीने पाण्याचा वापर करावा, आवश्यकतेनुसार पाण्याचा पुरेसा साठा करून ठेवावा, असे आवाहन महापालिकेने केले आहे.
Dombivali Railway Station: डोंबिवलीकरांचा प्रवास सुखकर होणार! स्थानक परिसराच्या विकासासाठी हालचाली; गर्दी, कोंडीतून कायमची सुटका
पुढील दोन दिवस कमी दाबाने पुरवठा
दरम्यान, मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या जलाशयांमध्ये पाण्याची पातळी कमी झाल्यामुळे ठाणे महापालिकेने मे महिन्यात दररोज १० टक्के पाणीकपात केलं होतं. त्यामुळे संपूर्ण मे महिना ठाणेकरांना त्रास सहन करावा लागला होता. 3 जूननंतरही पाणी पुरवठा सुरळीत होईल याची खात्री नाही. महापालिकेने शटडाउननंतर नेहमीसारखा पाणी पुरवठा पूर्ववत होण्यासाठी काही काळ लागू शकतो अशी माहिती दिली. त्यामुळे पुढील एक ते दोन दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा सुरू राहण्याची शक्यता आहे. रहिवाशांना पाणी साठवून ठेवून देखभाल दुरुस्तीच्या कामांदरम्यान पालिका प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन महापालिकेने नागरिकांना केले आहे
लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.
पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.
यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.
२०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.
लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.… आणखी वाचा