सुनील जाधव, बीड: मस्साजोगचे सरपंच दिवंगत संतोष देशमुख यांचे बंधू असलेल्या धनंजय देशमुख यांच्यावर बीडच्या ग्रामीण पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डोक्याला बंदूक लावून आपल्याला जीवे मारण्याच्या हेतूने धनंजय देशमुखने प्रयत्न केल्याचं तक्रारीत म्हटलं असून या प्रकारामुळे बीड जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर त्यांच्या आरोपींना कठोर शिक्षा व्हावी यासाठी धनंजय देशमुख यांनी आक्रमक भूमिका घेत भावाच्या न्यायासाठी रान उठवले होते. आपल्या भावाची झालेली निर्घृण हत्या माणुसकीला काळिमा फसणारी असून यातील दोषीवर कठोर कारवाई व्हावी आणि आरोपीच्या संबंधित गँगवर अनेक धक्कादायक आरोप धनंजय देशमुखच्या वतीने सतत सुरू होते. मात्र आता धनंजय देशमुख यांच्यावरच जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.
रवीराज साबळेंचाही उल्लेख
ग्रामीण पोलिसांकडे समाधान खिंडकर (वय-३०, व्यवसाय मजुरी रा. बेलवाडी) याने दिलेल्या फिर्यादीत म्हटलं आहे की, “मी आणि माझे मित्र दीपक रसाळ, योगेश मनेरी व दीपकच्या आणखी एका मित्रासोबत मोटारसायकलवर बीड बायपास रोडवरील हॉटेल शेतकरी येथे जेवणासाठी गेलो होतो. यावेळी रीलस्टर रवीराज साबळे हे देखील त्यांच्यासोबत हॉटेल शेतकरी राजा येथे जेवण करण्यासाठी आले होते. मी माझ्या मोबाईलवरून रवीराज साबळे यांना इन्स्टाग्रामवरील लाइव्ह दाखवत असताना धनंजय देशमुख यांच्या अंगरक्षकाने माझ्या हातातून मोबाईल घेतला. तेव्हा तुम्ही माझा फोन का घेतला असं मी म्हणताच धनंजय देशमुख हे पाठीमागून पळत आले आणि मला म्हणाले की, तू विनाकारण आमच्या वाकड्यात घुसू नकोस, माझ्याकडे एवढा पैसा आहे की मी चालता-चालता तुला संपवून टाकीन. त्यानंतर देशमुख यांनी अंगरक्षकाच्या कमरेचे पिस्तूल काढून जिवे मारण्याच्या उद्देशाने माझ्या डोक्याला लावले आणि मला म्हणाले की, तुला जिवंत सोडणार नाही, अशी धमकी दिली. त्यानंतर मला शिवीगाळ करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केला,” असं समाधान खिंडकर याने आपल्या फिर्यादीत म्हटलं आहे.
दरम्यान, याप्रकरणात बीडच्या ग्रामीण पोलीस ठाण्यात 192/2026,कलम 109,352,351,(2),3(5) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास ग्रामीण पोलीस करीत आहेत.
लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.
पत्रकारितेतील अनुभव अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.
मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU
शैक्षणिक पात्रता अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा