Solapur News : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे. अशातच सोलापुरात एक हृदयद्रावक घटना घडली आहे. या घटनेनं संपूर्ण सोलापूरमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.
सोलापूर बार्शी क्रिकेट मैदान आरवचा मृत्यू(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
इरफान शेख, सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील बार्शी शहरातील शिवशक्ती मैदानावर सुरू असलेल्या क्रिकेट समर कॅम्पमध्ये घडलेल्या दुर्दैवी अपघातप्रकरणी आयोजक आणि दोन प्रशिक्षकांविरुद्ध बार्शी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृत मुलगा आरव उर्फ विरेन योगीराज चौधरी (वय 15) याच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून ही कारवाई करण्यात आली आहे.
अंगावरुन जड रोलर गेला
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, काल शनिवारी सकाळी सुमारे सातच्या सुमारास आरव हा क्रिकेट सरावासाठी शिवशक्ती मैदानावर गेला होता. यावेळी क्रिकेट पिच तयार करण्यासाठी वापरला जाणारा जड रोलर मैदानावरील मुलांकडून ओढून घेतला जात होता. फिर्यादीतील आरोपानुसार, प्रशिक्षकांच्या सूचनेनुसार काही अल्पवयीन मुले हा रोलर ओढत असताना आरवचा तोल गेला आणि तो खाली पडला. त्यानंतर जड रोलर त्याच्या अंगावरून गेल्याने तो गंभीर जखमी झाला. Reel Star Rohini Paradhye : ‘माझ्या चिमणे मला सोडून जायचं नव्हतं गं’; रिलस्टार रोहिणीने आयुष्य संपवलं, पती निलेशची भावनिक पोस्ट, ढसाढसा रडला
उपचारापूर्वीच आरवचा मृत्यू
मैदानावरील उपस्थितांनी जखमी आरव चौधरीला तातडीने उपचारासाठी बार्शीतील जगदाळे मामा हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी करून उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे घोषित केलं. मृत मुलाचे वडील योगीराज चौधरी यांनी दिलेल्या तक्रारीत गंभीर निष्काळजीपणाचा आरोप करण्यात आला आहे. क्रिकेट मैदानावरील जड रोलर हाताळण्यासाठी कोणतीही प्रशिक्षित किंवा प्रौढ व्यक्ती नियुक्त करण्यात आली नव्हती. उलट क्रिकेट प्रशिक्षणासाठी आलेल्या अल्पवयीन मुलांकडूनच हे धोकादायक काम करून घेतले जात होते. अशा प्रकारच्या कामातून अपघात होऊ शकतो याची जाणीव असूनही आवश्यक सुरक्षा उपाययोजना करण्यात आल्या नाहीत, असा आरोप फिर्यादीत नमूद करण्यात आला आहे.
क्रिकेट प्रशिक्षकविरोधात गुन्हा दाखल
पोलिस नोंदीनुसार मातृभूमी प्रतिष्ठानचे संतोष ठोंबरे तसेच क्रिकेट प्रशिक्षक विवेक दुगम आणि अक्षय देबडवार यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) तसेच बाल न्याय कायद्यातील संबंधित तरतुदींनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे बार्शी शहरात हळहळ व्यक्त होत असून, अल्पवयीन मुलांकडून मैदानावरील जड यंत्रसामग्री हाताळून घेतली जात असल्याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. क्रीडा शिबिरांमधील सुरक्षा मानके, प्रशिक्षकांची जबाबदारी आणि आयोजकांकडून घेतल्या जाणाऱ्या खबरदारीबाबतही चर्चा सुरू झाली आहे. Pune Crime: सोलापुरातून पुण्यात आला, योगेशचा झाला ‘सिकंदर’; २२ जणांचा जीव घेणाऱ्या तरुणाबद्दल धक्कादायक माहिती या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक महेश गलगटे यांच्याकडे सोपविण्यात आला असून, घटनेच्या वेळी मैदानावरील परिस्थिती, उपस्थित साक्षीदारांचे जबाब, सुरक्षा व्यवस्थेची स्थिती आणि फिर्यादीतील आरोपांची सत्यता याबाबत पोलीस सखोल चौकशी करत आहेत.
लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.
प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.
‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.… आणखी वाचा