• Fri. Aug 7th, 2026
    मेडिटेशन सेंटरमधील महिलेवर एकतर्फी प्रेम, घटस्फोटित पुरुषाने जागा मालकाला संपवलं, पुण्यातील बाणेरमध्ये थरकाप

    Baner Meditation Centre Man Murder : बाणेर येथील ब्रह्मकुमारी मेडिटेशन सेंटरमधील एका महिलेशी असलेल्या एकतर्फी प्रेमातून झालेल्या वादात सेंटरच्या जागामालकाचा जीव घेण्यात आला

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    म. टा. प्रतिनिधी, पुणे : बाणेर येथील ब्रह्मकुमारी मेडिटेशन सेंटरमधील एका महिलेशी असलेल्या एकतर्फी प्रेमातून झालेल्या वादात सेंटरच्या जागामालकावर धारदार शस्त्राने सपासप वार करून खून करण्यात आला. धक्कादायक म्हणजे, खून केल्यानंतर आरोपी स्वतः चतुःशृंगी पोलिस ठाण्यात हजर झाला. ही घटना गुरुवारी (६ ऑगस्ट) सकाळी साडेअकरा वाजताच्या सुमारास रायकर फार्महाऊस परिसरात घडली.

    आरोपीचे ब्रह्मकुमारी सेंटरमधील महिलेवर एकतर्फी प्रेम

    घनश्याम संजय रायकर (वय ४९) असे खून झालेल्या जागा मालकाचे नाव आहे. या प्रकरणी सोलुमन सूर्यभान शेंडगे (वय ४९) याच्याविरुद्ध बाणेर पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घनश्याम रायकर यांच्या मालकीच्या जागेवर सुमारे २५ वर्षांपूर्वी ब्रह्मकुमारी मेडिटेशन सेंटर सुरू करण्यात आले आहे. आरोपी सोलुमन शेंडगे याचे लग्न होऊन घटस्फोट झाला असून, तो गेल्या काही काळापासून ब्रह्मकुमारी सेंटरमधील एका महिलेला एकतर्फी प्रेमातून त्रास देत होता.

    Maharashtra TimesVikhroli Crime : घाणेरडी गाणी लावल्याने वाद, जाऊबाईंचं दाराजवळ संतापजनक कृत्य, विक्रोळीत पती-मुलगा गमावलेल्या अंजूचा हादरवणारा जबाब

    पाठलाग करुन सपासप वार

    गुरुवारी सकाळी शेंडगे धारदार चाकू घेऊन मेडिटेशन सेंटरमध्ये आला. त्या वेळी रायकर तेथे उपस्थित होते. दोघांच्यात वाद झाला. शेंडगेने चाकू काढताच रायकर तेथून पळू लागले. मात्र, आरोपीने त्यांचा पाठलाग करून सपासप वार केले. रायकर यांना तातडीने जवळील रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.

    खून केल्यानंतर आरोपी शेंडगे थेट चतुःशृंगी पोलिस ठाण्यात गेला आणि खून केल्याची माहिती दिली. गुन्हा बाणेर पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडल्याने आरोपीला पुढील कारवाईसाठी बाणेर पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

    प्राथमिक तपासात ही घटना मेडिटेशन सेंटरमधील महिलेशी असलेल्या एकतर्फी प्रेमातून घडल्याचे समोर आले असून, पोलिस विविध अंगांनी तपास करीत आहेत.

    Maharashtra TimesPune Crime : शाळेपासून अफेअर, पुण्यात जाताच निकिता विसरली; संतप्त तरुणाने हिंजवडी गाठली, एक्सच्या प्रियकराला जीवानिशी संपवलं

    जामिनावरील आरोपी कोयत्यांसह जेरबंद

    दुसरीकडे, बाजीराव रस्त्यावर भर दिवसा झालेल्या अल्पवयीन मुलाच्या निर्घृण खूनप्रकरणात जामिनावर असलेल्या आरोपीला तीन विधिसंघर्षित बालकांसह गुन्हे शाखेच्या युनिट दोनने पर्वती परिसरातून ताब्यात घेतले. या कारवाईत १२ धारदार कोयते जप्त करण्यात आले असून, या शस्त्रांच्या जोरावर परिसरात दहशत माजविण्याचा त्यांचा कट असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

    गौरव राजू कांबळे (वय १८) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्यासह तीन विधिसंघर्षित बालकांना ताब्यात घेण्यात आले असून, या प्रकरणी पर्वती पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    Maharashtra TimesNagpur Accident : मुंबईत मेडिकल शिक्षण, उदयोन्मुख डॉक्टर तरुणीचा करुण अंत, रुग्णसेवेनंतर मध्यरात्री घरी जाताना काळाचा घालाप्राथमिक तपासात गौरव कांबळे आणि त्याच्या साथीदारांनी जनता वसाहत परिसरात स्वतंत्र टोळी तयार केल्याचे समोर आले आहे. जप्त करण्यात आलेले कोयते गौरवने स्वत: तयार केल्याचे समोर आले. गौरव पूर्वी वेल्डिंगच्या दुकानात काम करत होता. त्याच कामाच्या अनुभवातून त्याने कोयते स्वतः तयार केल्याची माहिती आहे. या शस्त्रांचा वापर करून परिसरात दहशत निर्माण करण्याचा त्यांचा उद्देश असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. पुढील तपास पर्वती पोलिस करत आहेत.