• Sat. Jun 6th, 2026

    पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिवादन – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    May 31, 2026
    पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिवादन – महासंवाद

    अहिल्यानगर दि. ३१ – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०१ व्या जयंतीनिमित्त चौंडी (ता.जामखेड) येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारकास भेट देऊन अभिवादन केले. यावेळी राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे व उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनीही अभिवादन केले.

    याप्रसंगी विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह भोसले,  कृषी मंत्री दत्तात्रय भरणे, ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे, आमदार गोपीचंद पडळकर, आमदार सुरेश धस, आमदार काशिनाथ दाते आदी उपस्थित होते.

    याप्रसंगी मुख्यमंत्र्यांसह उपस्थित मान्यवरांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे स्मारक व त्याच परिसरातील महादेव मंदिरात जाऊन दर्शन घेतले.

    ०००००

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed