• Wed. Sep 9th, 2026
प्रभादेवीतील नर्दुला टँक मैदानावरील प्रस्तावित पार्किंगच्या जागवेरून वाद, दोन्ही शिवसेना आमने-सामने

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

मुंबईतील सिद्धिविनायक मंदिर पुनर्विकास आणि कॉरिडॉर प्रकल्पामुळे नर्दुल्ला टँक मैदानावर प्रस्तावित केलेल्या पार्किंगच्या जागेवरून स्थानिक नागरिक आणि राजकीय पक्षांमध्ये तीव्र वाद निर्माण झाला आहे. कॉरिडॉर पुनर्विकास प्रकल्पांतर्गत मंदिराच्या आसपास गर्दी व्यवस्थापनासाठी नर्दुल्ला टँक मैदानाच्या जागेवर पार्किंग प्रस्तावित करण्यात आलंय आणि हाच प्रमुख वादाचा मुद्दा पाहायला मिळतंय.. या निर्णयामुळे स्थानिक नागरिकांच्या हक्काची मोकळी जागा हिरावून घेतली जाईल, असं बोललं जात आहे.. मैदान वाचवण्यासाठी स्थानिक रहिवाशांनी आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. तर शिवसेना शिंदे पक्षाचे नेते आणि सिद्धीविनायक गणपती मंदिर न्यासचे अध्यक्ष सदा सरवणकर यांनी या प्रस्ताविताला पाठिंबा दिलाय. या वादाच्या पार्श्वभूमीवर दोन्ही पक्षाचे नेते एकमेकांविरुद्ध उभे ठाकलेले पाहायला मिळतायत.. नेमकं त्यांचं म्हणणं काय? पाहुयात..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed