राज्यात कांद्याच्या दरावरून शेतकऱ्यांचा संताप वाढतच चालला आहे. बाजारात कांद्याला योग्य भाव मिळत नसल्याने महाविकास आघाडी आक्रमक झाली असून राज्यात अनेक ठिकाणी रस्ता रोको आंदोलन करण्यात आलं. नाशिकच्या चांदवडमध्येही शेतकऱ्यांनी जोरदार आंदोलन करत सरकारविरोधात घोषणाबाजी केली. या आंदोलनात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे विधान परिषदेचे आमदार अंबादास दानवे आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्यासह अनेक नेते, पदाधिकारी सहभागी झाले होते.. यावेळी आंदोलनामुळे हामार्गावर वाहनांच्या लांब रांगा लागल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प झालेली. काही वेळाने आंदोलन आणखी तीव्र झाल्याने पोलिसांनी कारवाई करत रोहित पवार, दानवे आणि सपकाळ यांना ताब्यात घेतलं.