• Sat. Jun 6th, 2026
    Nagpur Crime: सख्खा भाऊ पक्का वैरी! पैशांसाठी मोठ्या भावाने धाकट्याला संपवलं, नागपूर हादरलं

    Nagpur Crime: 4500 रुपयांसाठी मोठ्या भावाने लहान भावाला लोखंडी रॉडने वार करुन संपवल्याची घटना घडली आहे.

    नागपूर क्राईम(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    म. टा. प्रतिनिधी, नागपूर: हरवलेल्या साडेचार हजार रुपयांच्या संशयातून झालेल्या वादात मोठ्या भावाने लहान भावाची लोखंडी रॉडने हत्या केली. ही धक्कादायक घटना नंदनवन पोलिस ठाण्याच्या हद्दीतील हिवरीनगर झोपडपट्टीत उघडकीस आली.

    भगवान गोविंदराव बाबुले (४०) असे आरोपीचे नाव असून त्याच्यावर भाऊ प्रदीप गोविंदराव बाबुले (३७) याच्या हत्येचा आरोप आहे. दोघेही हिवरीनगर झोपडपट्टी परिसरात एकाच घरात आपापल्या कुटुंबासह वेगवेगळे राहात होते. दोघेही मजुरीचे काम करत होते. त्यापैकी प्रदीप हा फर्निचरचे काम करीत असे. काही दिवसांपूलाला एका कामाचे साडेचार हजार रुपये मिळाले होते. मात्र, हे पैसे हरवल्याचे त्याच्या लक्षात आले. पैसे सापडत नसल्याने प्रदीपने त्याचा संशय मोठा भाऊ भगवान याच्यावर घेतला. यावरून रविवारी रात्री दोघांमध्ये जोरदार वाद झाला.

    Chandrashekhar Bawankule | महायुतीत फूट ते शिंदेंचा दिल्ली दौरा, चंद्रशेखर बावनकुळे काय म्हणाले?

    वाद विकोपाला गेल्यानंतर संतापलेल्या भगवानने घरात पडलेल्या लोखंडी रॉडने प्रदीपच्या डोक्यावर वार केले. गंभीर जखमी झालेल्या प्रदीपचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. माहिती मिळताच नंदनवन पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. या दोघांची बहीण विद्या अरईकर हिने दिलेल्या तक्रारीवरून नंदनवन पोलिसांनी आरोपी भगवान बाबुलेविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. पुढील तपास सुरू आहे.

    Maharashtra TimesMaharashtra School News: राज्यातील शाळा उशिरा सुरू होणार? 15 जूनची तारीख पुढे ढकलली जाण्याची शक्यता; मंत्र्यांनी दिले स्पष्ट संकेत
    तीन दिवसांतील दुसरी घटना

    मोठ्या भावाने लहान भावाची हत्या करण्याची ही गेल्या तीन दिवसांतील दुसरी घटना आहे. हिंगणा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कटंगधरा येथे कौटुंबिक वादातून मोठ्या भावाने लहान भावाची हत्या केल्याची घटना शनिवारी उघडकीस आली होती. यात हरिश्चंद्र बाबुलाल पंधराम (३४) याने त्याचा लहान भाऊ शुभम याच्यावर झोपेतच लाकडी दांड्याने प्रहार करत त्याचा खून केला होता

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

    किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

    पत्रकारितेतील अनुभव
    किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

    शैक्षणिक पात्रता
    किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.… आणखी वाचा