MLC Election Congress Corporators Not Reachable : वडेट्टीवार यांनी निवडणूक लढणार नसल्याचे स्पष्ट केले. हे सारे घडत असतानाच काँग्रेसचे नगरसेवक नॉट रिचेबल झाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
राज्यात विधान परिषदेच्या १७ जागांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे. वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी अजून कुठलाही उमेदवार निश्चित झालेला नाही. महाविकास आघाडीकडून शिवानी वडेट्टीवार, एहतेशाम अली यांची नावे चर्चेत आली.
Nashik Politics: नाशिकच्या जागेवरुन भाजप-शिवसेनेचे जुळेना सूत; इच्छुकांच्या मुंबई-जळगावला वाऱ्या
संपर्काबाहेर असलेले नगरसेवक हे चिमूर, सिंदेवाही, नागभीड, ब्रह्मपुरी आणि सावलीतील अधिक असल्याचीही चर्चा आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने काँग्रेसमधील अंतर्गत संघर्ष पुन्हा समोर आला आहे. वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात महापालिकेतील नगरसेवक, नगर परिषद आणि नगरपंचायत समस्य मतदान करणार आहेत.
तिन्ही जिल्ह्यांमध्ये सध्या जिल्हा परिषदेचे निर्वाचित सदस्य नसल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांतील सदस्यांवरच निवडणुकीची जबाबदारी असणार आहे. या मतदारसंघातील एकूण मतदारसंख्या ९७७ इतकी आहे.
Rohit Pawar: काळाबाजार शेतकरी नव्हे, मंत्रीच करतात; गिरीश महाजनांच्या वक्तव्यावर रोहित पवारांची टीका
काँग्रेसने शोध घ्यावा, आमचा काय संबंध ?
काँग्रेसचे नगरसेवक कुठे गेले, याच्याशी आमचा संबंध नाही. त्यांच्या पक्षातील नेत्यांनीच विचार करावा, असा टोला महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेसला लगावला आहे. महायुती सर्व १७जागांवर विजय मिळविणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
‘भारत याचक म्हणून गेला नाही’; Devendra Fadnavis यांनी सांगितली आंतरराष्ट्रीय घडामोडींची इनसाईड स्टोरी
पक्षादेश डावलणाऱ्यांवर कारवाई
पक्षादेश मोडणाऱ्या काँग्रेसच्या नगरसेवकांवर कठोर कारवाई केली जाईल. व्हीप जारी करून त्यांचे सदस्यत्व रद्द करण्याची प्रक्रिया राबवली जाईल, असा इशारा काँग्रेसचे विधिमंडळातील पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी दिला आहे. काही नगरसेवकांना पाच लाख रुपयांचे टोकन देण्यात आले आहे. काहींचा भाव १५ लाखांपर्यंत गेला आहे. नगरसेवकांना कोट्यवधीची आमिषे दाखवून सत्ताधारी पक्ष निवडणुका पैशांच्या जोरावर जिंकण्याचा प्रयत्न करीत आहेत, असा आरोप त्यांनी केला. भाजपचे काही नगरसेवक काँग्रेसच्या संपर्कात असल्याचा दावाही त्यांनी केला.
