उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या ठाण्यात मनसेचा पदाधिकारी मेळावा पार पडला. या मेळाव्यातून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचाही खरपूस समाचार घेतला. राज ठाकरेंनी आपल्या स्टाईलने नक्कल करत सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. तसेच महाराष्ट्रातील जनतेला सावध राहण्याचा इशारा देखील दिला.