• Sun. Sep 6th, 2026

Raj Thackeray : पुण्यात अमित ठाकरेंनी पंतप्रधानांचा फोटो हटवला, आता राज ठाकरेंचं सखोल भाष्य; नेमकं काय म्हणाले?

Raj Thackeray : ‘मला असं वाटतं जे सरकारी अस्थापन आहेत, शाळा आहेत, इतर काही गोष्टी असतील, त्यांनी फोटो लावावेत फक्त ही गोष्ट त्यांनी नीट पाळणं गरजेचं आहे’, असंही राज ठाकरेंनी म्हटलं आहे.

पुणे राज ठाकरे भाषण(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
पुणे : पुण्यातील सरकारी तंत्रशिक्षण महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या सुविधांची पाहणी करण्यासाठी गेलेले महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांचा दौरा चांगलाच चर्चेत आला आहे. अमित ठाकरे मुख्याधापकांच्या कार्यालयात उभे असताना एका विद्यार्थ्याने छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शेजारी नरेंद्र मोदींचा फोटो लावण्यात आल्याचं त्यांच्या निदर्शनास आणून दिलं. तेव्हा अमित ठाकरे यांनी शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बाजूला नरेंद्र मोदी यांचा फोटो कशाला, असं मुख्याधापकांना विचारले. एवढंच नव्हे तर पुढच्याच क्षणाला मनसेच्या प्रशांत कनोजिया, विक्रांत भिलारे या कार्यकर्त्यांनी नरेंद्र मोदी यांचा फोटो तिथून खाली उतरवला. या घटनेनंतर अमित ठाकरेंसह 20 ते 25 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते, त्यानंतर फोटो उतरवणाऱ्या दोन्ही कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली होती. आता या प्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाष्य केलं आहे. मनसेच्या पदाधिकारी मेळाव्यावेळी राज ठाकरे बोलत होते.

राज ठाकरे काय म्हणाले?

‘मध्यंतरी एक प्रकरण झालं, अमित पुण्याला गेला असताना पंतप्रधान मोदींचा फोटो काढण्यावरून वाद निर्माण झाला, छत्रपती शिवाजी महाराज, बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले या सर्व मंडळींच्या रांगेत दुसरं कोणी बसू शकत नाही. सरकारी कार्यालयामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो असायला पाहिजे का? तर असायला पाहिजे, लावला पाहिजे का? तर हो लावला पाहिजे, ते पंतप्रधान आहेत, बाकी मतभेद शंभर असतील, पण दुसऱ्या भिंतीवरती, त्या रांगेत नाही, मला असं वाटतं जे सरकारी अस्थापन आहेत, शाळा आहेत, इतर काही गोष्टी असतील, त्यांनी फोटो लावावेत फक्त ही गोष्ट त्यांनी नीट पाळणं गरजेचं आहे, कोणाबरोबर कुठले फोटो लागले पाहिजेत आणि कुठल्या रांगेमध्ये कोणाचे फोटो असले पाहिजेत, आणि पंतप्रधान असतील कोणी असेल त्यांचे फोटो कोणत्या रांगेत, भिंतीवरती लागले पाहीजेत, ते मला वाटतं कोर्टामध्ये देखील कळलं पाहिजे, आणि इतर शैक्षणिक आणि अस्थापनामध्ये देखील कळलं पाहिजे त्यामुळे आत्ताच सुधारून घ्या’, असंही राज ठाकरेंनी म्हटलं आहे.

पुण्यात नेमकं काय घडलं?

पुण्यातील सरकारी तंत्रशिक्षण महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या सुविधांची पाहणी करण्यासाठी गेलेले महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांचा दौरा एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला. अमित ठाकरे सोमवारी शिवाजीनगर येथील सरकारी तंत्रशिक्षण महाविद्यालयात गेले होते. याठिकाणी अमित ठाकरे यांनी कँटिनमधील जेवण आणि स्पोर्टस कोट्यातली खेळाडूंसाठी प्रशिक्षक नसल्याबद्दल महाविद्यालयाच्या मुख्याध्यापकांना जाब विचारला. अमित ठाकरे मुख्याधापकांच्या कार्यालयात उभे असताना एका विद्यार्थ्याने याठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शेजारी नरेंद्र मोदींचा फोटो लावण्यात आल्याचं त्यांच्या निदर्शनास आणून दिलं. तेव्हा अमित ठाकरे यांनी शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बाजूला नरेंद्र मोदी यांचा फोटो कशाला, असे मुख्याधापकांना विचारले. एवढेच नव्हे तर पुढच्याच क्षणाला मनसेच्या कार्यकर्त्यांनी नरेंद्र मोदी यांचा फोटो तिथून खाली उतरवला. या प्रसंगाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यावरुन आता पुण्यातील भाजप नेते आक्रमक होण्याची शक्यता आहे.

प्रशांत पाटील

लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.

प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.

‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.… आणखी वाचा