• Wed. Sep 9th, 2026

Dhananjay Mahadik: कृष्णराज महाडिक काँग्रेसचे? मुलाच्या पदावरून खासदार धनंजय महाडिकांचा गोंधळ, दहीहंडी कार्यक्रमात नक्की काय म्हणाले?

कोल्हापूर: कोल्हापूरच्या ऐतिहासिक दसरा चौक येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘युवाशक्ती दहीहंडी’ कार्यक्रमात राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांची बोलताना एक मोठी चूक झाली आहे. आपल्या मुलाच्या, कृष्णराज महाडिक यांच्या राजकीय पदाचा उल्लेख करताना त्यांनी त्यांना चक्क ‘युवक काँग्रेसचे’ प्रदेशाध्यक्ष म्हटले, तर प्रत्यक्षात कृष्णराज महाडिक यांची नियुक्ती भाजप युवा मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षपदी झाली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे. सोशल मीडियावरून ही चूक असलेला व्हिडिओ सर्वच ठिकाणांवरून हटवण्याचा प्रयत्न झाला तरी सध्या सोशल मीडियावर यावरील व्हिडिओ मिम्स व्हायरल झाले आहेत.

नेमकं काय घडलं?

दहीहंडी उत्सवात उपस्थितांना संबोधित करताना धनंजय महाडिक आपल्या मुलावर सोपवण्यात आलेल्या जबाबदारीबद्दल बोलत होते. ते म्हणाले, “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कृष्णराज महाडिक यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवली असून, त्यांनी त्याला महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष करून टाकले आहे.” भाजप खासदाराने आपल्या मुलाला थेट काँग्रेसचा पदाधिकारी जाहीर केल्याने व्यासपीठावरील नेते आणि उपस्थित नागरिकही अवाक् झाले.

गोकुळमध्ये महायुतीची ‘क्लीन स्वीप’ची भविष्यवाणी

याच व्यासपीठावरून महाडिकांनी आगामी गोकुळ दूध संघ निवडणुकीबाबतही वक्तव्य केले आहे. “गोकुळ ही कोल्हापूरच्या शेतकऱ्यांची कामधेनू आहे,” असे सांगत त्यांनी या निवडणुकीत महायुती 25 विरुद्ध महाविकास आघाडी 0 असा निकाल लागेल, अशी भविष्यवाणी केली. विधानसभेप्रमाणेच गोकुळमध्येही महायुतीचा वरचष्मा राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

कोल्हापूरच्या विकासाचा अजेंडा

भाषणादरम्यान महाडिकांनी कोल्हापूरच्या विकासावरही भाष्य केले. विरोधकांनी दोन बसेस आणून गाजावाजा केला, पण आम्ही 100 इलेक्ट्रिक बसेस आणल्या असून लवकरच त्याचे उद्घाटन होईल, कोल्हापूर विमानतळाची धावपट्टी 2300 मीटर होणार असून, त्यामुळे येथे मोठी एअरबस विमाने उतरू शकतील, शेंडा पार्क येथे 80 एकर जागेत आयटी पार्क उभारून स्थानिक तरुणांना रोजगार दिला जाईल, तसेच कोल्हापूरची हद्दवाढ आणि शक्तिपीठ महामार्ग झाल्यास जिल्ह्याचा विकास अमर्याद होईल, असेही त्यांनी भाषणात बोलताना नमूद केले.

शिवनेरी पथकाची 3 लाखांची दहीहंडी

दरवर्षी कोल्हापूरकर या सोहळ्याला हजारोंच्या संख्येने उपस्थिती लावत असतात. चित्तथरारक अशा या दहीहंडी सोहळ्यात अनेक गोविंदा पथके आपले नशीब आजमावत असतात. यंदा या स्पर्धेत तासगाव येथील शिवनेरी पथकाने बाजी मारली. पथकाकडून थरारक 8 थर रचून धनंजय महाडिक युवाशक्ती दहीहंडी फोडत 3 लाख रुपयांचे पहिले बक्षीस पटकावण्यात आले.

दरम्यान, या सोहळ्याला मंत्री हसन मुश्रीफ, महादेवराव महाडिक, आमदार राजेश क्षीरसागर आणि इतर मान्यवर उपस्थित होते. तर मुलाच्या पदाबाबतच्या चुकीच्या उल्लेखामुळे ही दहीहंडी सध्या राजकीय चर्चेचा विषय ठरली आहे.

लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.

पत्रकारितेतील अनुभव
अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.

मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU

शैक्षणिक पात्रता
अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed